आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते फेड गोल्ड बँकेच्या 376 व्या शाखेचे उद्घाटन

मुरबाड शहरातील गणपती हॉस्पिटलच्या खाली फेड बँक फास्ट फायनान्सीयल सर्व्हिसेसच्या गोल्ड लोन शाखेचे उदघाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते फेड गोल्ड बँकेच्या 376 व्या शाखेचे उद्घाटन
Gold Loan Fed Bank

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

   मुरबाड शहरातील गणपती हॉस्पिटलच्या खाली फेड बँक फास्ट फायनान्सीयल सर्व्हिसेसच्या गोल्ड लोन शाखेचे उदघाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या बँकेने सर्वसामान्य माणसाला संकटात मदतीचा हात द्यावा, या फेड बँकेने फक्त गोल्ड लोन पुरते मर्यादीत न राहता सर्वसामान्यांना परवडणारे गृहकर्ज, इन्शुरन्स व अन्य स्कीम सुरू कराव्यात अशा सूचना आमदारांनी करीत बँकेला शुभेच्छा दिल्या.(Gold Loan Fed Bank)

  तर या प्रसंगी फेड बँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे झोनल  बिझनेस हेड शैलेंद्र वाडे यांनी सांगितले की, फेड बँकेच्या या शाखेत कमीत कमी व्याज दर आणि अत्यल्प प्रक्रिया शुल्कात गोल्ड लोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. केवळ अर्धा तासात ग्राहकाला लोन सुविधा पुरविण्यात ऐईल. संपूर्ण भारतभर बँकेच्या अनेक शाखा असून मुरबाड येथील 376 वि  गोल्ड लोन शाखा आहे.अद्याप ७० शाखा महाराष्ट्रात पुढच्या काळात सुरू करण्यात येणार आहेत.

 फेड बँक गोल्ड लोन शाखेच्या उदघाटन प्रसंगी बँकेचे झोनल बिझनेस हेड शैलेंद्र वाडे, रिजनल बिझनेस हेड पियुष सिंग, विपणन व्यवस्थापक अमोल सोनावणे, एरिया मॅनेजर महेश वाळुंजू, शाखा व्यवस्थापक चेतन पतंगराव,भाजप तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, सुरेश बांगर, वसंत जाधव, शंकर गायकर व इतर मान्यवर व बँकेचा स्टाफ उपस्थित होता.(Gold Loan Fed Bank)