सरकारी बँकेने कर्जदारांना दिली मोठी खूशखबर

गृहकर्ज 6.90 टक्के व्याज दराने घेता येईल. त्याचबरोबर वाहन कर्जाचो व्याजदर 7.30 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

सरकारी बँकेने कर्जदारांना दिली मोठी खूशखबर
Government Bank Updates

सरकारी बँकेने कर्जदारांना दिली मोठी खूशखबर

गृहकर्ज 6.90 टक्के व्याज दराने घेता येईल. त्याचबरोबर वाहन कर्जाचो व्याजदर 7.30 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

सणासुदीपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना मोठी खूशखबर दिली आहे. बँकेने सोने, गृहनिर्माण, कार आणि सुवर्ण कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यामुळे तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत.जेव्हा तुम्ही कर्ज घेता, तेव्हा त्या कर्जाशी संबंधित अनेक बाबी तुम्हाला आधी कराव्या लागतात. त्यामुळे मोठ्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो.यात इतर गोष्टींबरोबरच व्याज, प्रक्रिया शुल्क, प्रशासकीय शुल्क, प्रीपेमेंट दंड यांचा समावेश असतो.(Government Bank Updates)

 मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी बँकेने प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. ही ऑफर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू असेल.बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गृहकर्ज 6.90 टक्के व्याज दराने घेता येईल. त्याचबरोबर वाहन कर्जाचो व्याजदर 7.30 टक्के निश्चित करण्यात आला आहे. तसेच सुवर्ण कर्ज योजनेतही बदल करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे.20 लाख रुपयांपर्यंतच्या सुवर्ण कर्जाचा व्याजदर 7.10 टक्के आहे. त्याचबरोबर 1 लाख रुपयांपर्यंतच्या सुवर्ण कर्जासाठी प्रक्रिया शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे

.बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले आहे की, गृहकर्जाचे नियमित ईएमआय भरणाऱ्यांना दोन ईएमआय माफ केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त कर्ज मधेच बंद करण्यासाठीही शुल्क भरावे लागणार नाही. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी 5 लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतले असेल आणि आता तुम्हाला कर्ज देणाऱ्या बँकेला एक लाख रुपयांची एकरकमी रक्कम देऊन तुमच्या कर्जाचा कालावधी किंवा मासिक हप्त्याची रक्कम कमी करायची असेल तर त्याला प्रीपेमेंट म्हणतात.(Government Bank Updates)

विहित कालावधीत कर्ज बंद करण्यासाठी किंवा परतफेड करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही कर्जार्ची संपूर्ण थकीत रक्कम बँकेला परत करायची असते.