देहर्जे प्रकल्पाचे नांव बदलुन जांभा प्रकल्प करा-ग्रुप ग्रांमपंचायत जांभा/पोचाडे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केला ठराव

२७ ऑगस्ट २०२१ वार-शुक्रवार रोजी मा. प्रशासक एस.टी.पाकलवड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

देहर्जे प्रकल्पाचे नांव बदलुन जांभा प्रकल्प करा-ग्रुप ग्रांमपंचायत जांभा/पोचाडे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केला ठराव
Gram Panchayat Jambha

ग्रुप ग्रामपंचायत जांभेची ग्रामसभा दिनांक:-२७ ऑगस्ट २०२१ वार-शुक्रवार रोजी मा. प्रशासक एस.टी.पाकलवड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.ग्रामसभा अजेंड्याप्रमाणे इतर विषयांबरोबर विषय क्र-०२ देहर्जे पाणीपुरवठा प्रकल्पामुळे जांभे गावातील बाधित शेतकय्रांची जमिन संपादन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.त्यावेळी देहर्जे प्रकल्पाअंतर्गत जांभा ग्रामस्थाच्या जात असलेल्या जमिनीचा मोबदला द्या व प्रकल्पाखाली असलेल्या वस्तीचे पुनर्वसन करा व नंतर काम चालु करा आणि जो पर्यंत जांभा ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत प्रकल्पाच्या कामाला स्थगिती द्या. असा महत्वाचा ठराव ग्रुप ग्रामपंचायत जांभा/पोचाडे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये करण्यत आला.(Gram Panchayat Jambha)

तर काही ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन ग्रामस्थांची दिशाभुल करत असल्याचा आरोप ग्रामसभेमध्ये केला व पुढे उध्दभवणाय्रा समस्यांचे निरासन व सामान्य जनतेच्या समस्यांना लढा देण्यासाठी ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामसभेमध्ये संघर्ष समिती स्थापन केली.त्यावेळी ग्रुप ग्रामपंचायत जांभे/पोचाडेचे ग्रामसेवक नितिन गवळी मा.प्रशासक एस.टी.पाकलवड,विक्रमगडचे नायब तहसिलदार साहेब,संबंधित देहर्जे पाणीपुरवठा प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी,माजी जि. प. सदस्य,अंगणवाडी सेविका,शिक्षक,माजी ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील,प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रुप ग्रमापंचायत जांभा/पोचाडे अंतर्गत येणारे गावामधील ग्रामस्थ उपस्थित होते. (Gram Panchayat Jambha)

     विक्रमगड प्रतिनिधी

अजय लहारे