पुणे विद्यापीठ येथे कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन

महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सा.फु. पुणे विद्यापीठाने अनेक उपाययोजना राबवल्या. पैकी सा. फु. पुणे विद्यापीठ आरोग्य केंद्रामध्ये एप्रिल पासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

पुणे विद्यापीठ येथे कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन
Gratitude Award Ceremony at Pune University

पुणे विद्यापीठ येथे कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन

महामारीचा  वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सा.फु. पुणे विद्यापीठाने अनेक उपाययोजना राबवल्या. पैकी सा.  फु. पुणे विद्यापीठ आरोग्य केंद्रामध्ये एप्रिल पासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. 

मुंबई-गणेश हिरवे:

कोवीड-१९ महामारीचा  वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सा.फु. पुणे विद्यापीठाने अनेक उपाययोजना राबवल्या. पैकी सा.  फु. पुणे विद्यापीठ आरोग्य केंद्रामध्ये एप्रिल पासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या अनुषंगाने विद्यापीठ आरोग्य केंद्राचे प्रमुख डाॅ. शशिकांत दुधगांवकर सर यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण टिमने कोवीड काळात अत्यंत जबाबदारी पूर्वक प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले कर्तव्य बजावले. व अत्यंत कमी कालावधीत परिचारिका श्रीमती विद्यागौरी शाळीग्राम यांनी आज जवळपास  साडे सहा हजारापेक्षा जास्त लोकांना लसीकरण करण्याचा उच्चांक गाठला. या सेवेप्रती सामाजिक ऋण व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंटक कामगार संघटनेच्या वतीने कृतज्ञता सोहळा गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ रोजी सायंकाळी ४.३० वाजता शिवाजी सभागृह, सा. फु. पुणे विद्यापीठ, मुख्य इमारत येथे पार पडला.(Gratitude Award Ceremony at Pune University) 


याप्रसंगी सा. फु. पुणे विद्यापीठ आरोग्य केंद्राचे प्रमुख डाॅ. शशिकांत दुधगांवकर, डाॅ. रोहित पाटील यांचे सह दैनंदिन कोव्हीड लसीकरण मोहीमेच्या अंमलबजावणीत अत्यंत मोलाचा वाटा असणारे गणेश सावंत, नवनाथ पाटोळे यांचेसह १७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान मा. कुलगुरू प्रा. डाॅ. नितीन करमळकर सर, उपकुलगुरू डाॅ. एन. एस. उमराणी सर, कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार सर व  परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक श्री. महेश काकडे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला.  


इंटक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ यांनी विद्यापीठाने योग्य प्रसंगी लसीकरण मोहीम राबविण्यात आली याबद्दल मा. कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर सर, कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांचे विशेष आभार माणून कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजना मागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर सर यांनी माणुसकी ही सर्वात श्रेष्ठ असून त्यामुळेच आपण कोरोना सारख्या दुर्धर आजारावर यशस्वी उपाय योजना लावण्यात हातभार लावू शकलो व विद्यापीठ सामाजिक क्षेत्रातही सेवेमध्ये तत्पर असल्याचे सांगितले.  तर लसीकरण सुरू करण्यासाठी संघटनेने पाठपुरावा केला असून  कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करून त्याची परिपूर्ती केली.

असे गौरव उदगार कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी काढले. आरोग्य कर्मचारी यांचे पाठीवर थाप देण्यासाठी आवश्यक असलेला सन्मान सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल डाॅ. दुधगांवकर यांचेसह सर्वच मान्यवर यांनी इंटक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे आभार मानले तर पालकाची जबाबदारी मानून सर्व आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांची काळजी डाॅ. दुधगांवकर यांनी  घेतली असल्याची हृदयस्पर्शी भावना वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ रवीराज काळे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त  केली. याप्रसंगी  अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विलास आढाव, शैक्षणिक बहू माध्यम केंद्राचे प्रमुख डाॅ. समिरण सहस्त्रबुद्धे, उपकुलसचिव कोळीसर, उपकुलसचिव लोखंडे सर यांचेसह विद्यापीठातील अधिकारी वर्ग, इंटक संघटनेचे उपाध्यक्ष डाॅ. संजय नेवसे, खजिनदार प्रशांत जाॅन, जयंत कुलकर्णी इतर संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन महेश मंडलिक, संतोष झांजरे, राजू  खामकर, तिरूमणी सुब्रमण्यम, जितू कोंडे, ज्ञानेश्वर दुधे, महावीर गडदरे, रामदास घोडे, प्रशांत सुतार, कीरण तडाखे, अंकुश देशमुख, गणेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर घडियार तर आभार प्रदर्शन  सरचिटणीस श्री सुभाष मुळे यांनी केले.(Gratitude Award Ceremony at Pune University)