बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल ३० जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल ३० जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल 30 जुलै रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होऊ नये म्हणून बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. बोर्डाकडून यापूर्वी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता.(12th result to be announced on July 30?)
महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे.
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.सुप्रीम कोर्टानं बारावीच्या परीक्षांसदर्भात देशातील सर्व बोर्डांना महत्वाचा आदेश दिला आहे.(12th result to be announced on July 30?)
केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड म्हणजेच CBSE आणि CICSE आणि सर्व राज्यांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे.