कियारा अभिनयापूर्वी करायची शिक्षक म्हणून काम

अभिनेत्री कियारा अडवाणीने हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे.

कियारा अभिनयापूर्वी करायची शिक्षक म्हणून काम
Happy Birthday Kiara Advani

कियारा अभिनयापूर्वी करायची शिक्षक म्हणून काम

अभिनेत्री कियारा अडवाणीने  हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणीने हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आज कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे. कियाराचे वडील जगदीप अडवाणी एक मोठे उद्योगपती आहेत.अभिनेत्रीची आई जेनेविझ जाफरी शिक्षिका आहेत. कियारा विशेषतः तिच्या चाहत्यांमध्ये सध्या राहणीमानामुळे ओळखली जाते.कियाराचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून झाले. एवढेच नाही तर अभिनेत्रीने अभिनयाचे बारकावे अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून शिकले आहेत.(Happy Birthday Kiara Advani)

आज, कियाराच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.बऱ्याचदा चाहत्यांना असे वाटते की कियाराने आपल्या करिअरची सुरुवात ‘एमएस धोनी’ या चित्रपटातून केली होती. परंतु, अभिनेत्रीने 2014 मध्ये ‘फुगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही आणि कियाराला देखील प्रसिद्धी मिळू शकली नाही.

अभिनेत्रीचे खरे नाव कियारा नाही. होय चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी तिचे नाव आलिया अडवाणी असल्याचे अनेक वेळा अभिनेत्रीने स्वतः सांगितले आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की, सलमान खानच्या सल्ल्याने तिने तिचे नाव आलियावरून बदलून कियारा केले. अभिनेत्रीने तिचे नाव बदलले, कारण आलिया भट्ट आधीच इंडस्ट्रीमध्ये होती आणि ती प्रसिद्धही झाली होती.कियाराच्या आजीने तिला तिच्या करिअरमध्ये कामाचा अनुभव वाढवण्यासाठी शिक्षक म्हणून काम करण्याचा सल्ला दिला होता.

एका मुलाखतीत स्वतः कियारा अडवाणीने सांगितले होते की, ‘अंजाना अंजानी’ या चित्रपटातील प्रियंकाच्या पात्राचे नाव कियारा आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की, ती प्रियंकाच्या या नावामुळे खूप प्रभावित झाली आहे, म्हणून तिने हे नाव स्वतःसाठी निवडले.कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नाव आलिया असल्याचे अजूनही चाहत्यांच्या लक्षात आले नसेल. कियारा आपले खरे नाव अर्थात आलिया हे नावाच्या मध्यभागी लावते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर कियारा आलिया अडवाणी असे नाव ठेवले आहे.

 तिला मुलांना शिकवण्याची आवड होती. अभिनेत्रीने कुलाबा येथील अर्ली बर्ड स्कूलमध्ये शिक्षक म्हणूनही काम केले. इथेच तिची आई मुख्याध्यापिका होती.कियाराला 2016च्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून ओळख मिळाली. यानंतर अभिनेत्री काही चित्रपटांमध्ये दिसली, पण तिला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर ‘कबीर सिंह’ या चित्रपटाने अभिनेत्रीला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर अभिनेत्री पुन्हा तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. अलीकडेच कियाराच्या ‘शेर शाह’ या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.(Happy Birthday Kiara Advani)

विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित या चित्रपटात ती एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.