तापसी पन्नूच्या चित्रपटांनी समाजाला दिला हे सल्ला

तापसीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या चित्रपटांपासून केली आणि त्यानंतर ती मुंबईत आली.

तापसी पन्नूच्या  चित्रपटांनी समाजाला दिला हे सल्ला
Happy Birthday Taapsee Pannu

तापसी पन्नूच्या चित्रपटांनी समाजाला दिला हे सल्ला

तापसीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या चित्रपटांपासून केली आणि त्यानंतर ती मुंबईत आली.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री तापसी पन्नू तिचा वाढदिवस साजरा करत आहे, तिचा जन्म 1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्लीत झाला होता. तापसी पन्नूनं तिच्या चित्रपटांद्वारे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. तापसीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या चित्रपटांपासून केली आणि त्यानंतर ती मुंबईत आली. तापसी तिचे आयुष्य अगदी सोप्या पद्धतीने जगते, तिचे आयुष्य खुल्या पुस्तकासारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. तिच्या वाढदिवशी, आम्ही तिच्या स्त्रीभिमुख चित्रपटांबद्दल बोलणार आहोत.(Happy Birthday Taapsee Pannu)

बॉलिवूडमध्ये खूप कमी अशा अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत दिग्दर्शक एक पूर्ण चित्रपट बनवतात, आजच्या युगात तापसी पन्नू अशी अभिनेत्री आहे जी एकट्या मुख्य भूमिकेतूनही चित्रपटाला शेवटपर्यंत नेण्यास सक्षम आहे.नुकतंच, तापसी ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात दिसली, या चित्रपटात 2 नायक असूनही, तिनं तिच्या अभिनयानं सर्वांना आश्चर्यचकित केलं, या चित्रपटातही तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.आणि यावर सतत चर्चा होत असते.

पिंक चित्रपटात तापसी पन्नू अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना दिसली होती, या चित्रपटात असं दाखवण्यात आलं होतं की जी मुलगी पुरुषांसोबत सिगारेट ओढते किंवा लहान कपडे घालते ती मुलांसोबत काहीही करायला तयार असते असं नाही ” ती दारू पिते म्हणून तिची हत्या करण्यात आली, हा चित्रपट स्वतः शूजित सरकार यांनी लिहिला होता.अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या पात्राबद्दल तापसी म्हणाली होती की,माझ्यासाठी ही एक मोठी भूमिका होती, ती साकारताना मला वाटलं की मी आज करोडो लोकांचा आवाज बनली आहे.

बॉलीवूडमध्ये यापूर्वी लव्ह ट्रँगलवर अनेक चित्रपट बनले आहेत, मात्र मनमर्जियानची कथा आजच्या कथेसारखीच आहे, या चित्रपटात आपल्याला तापसीसह विकी कौशल आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसले. या चित्रपटाच्या कथेमध्ये विकी आणि तापसी एकमेकांच्या प्रेमात आहेत, पण विकी अद्याप तापसीशी लग्न करायला तयार नाही. ही कथा आजच्या पिढीच्या कथेसारखी आहे. ज्यामुळे तापसी पन्नूनं अभिषेक बच्चनशी कुटुंबाच्या सांगण्यावरून लग्न केलं. मोठ्या शहरांमध्ये प्रेमाचा अर्थ कसा बदलला जातो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

तापसी पन्नू एका मुस्लिम कुटुंबासाठी वकिलाची भूमिका साकारत आहे, ज्याला देशद्रोही आणि दहशतवादी म्हणून संबोधलं गेलं आहे, या चित्रपटात तापसीनं एका वकिलाची भूमिका केली आहे, जिनं मुस्लिमशी लग्न केले आहे.  या चित्रपटाच्या कथेत, अभिनेत्रीला जो विषय दाखवायचा आहे, तो फक्त असं म्हणतो की एक कट्टर हिंदू आणि एक चांगला मुस्लिम होण्यापेक्षा एक चांगला माणूस असणे खूप चांगलं आहे.

थप्पड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटासंदर्भात अनेक प्रकारचे ट्रोल समोर आले. पण चित्रपटाची अभिनेत्री चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत उभी राहिली आणि तिनं सतत चित्रपटाला पाठिंबा दिला.पतीचा अभिमान मोडून काढण्यासाठी तिला हा निर्णय घ्यावा लागतो.(Happy Birthday Taapsee Pannu)

या चित्रपटात एक स्त्री तिच्या सन्मानासाठी स्वतःसाठी कसा निर्णय घेते हे दाखवलं आहे.