सफाळे लायन्स क्लबच्या माध्यमातून पोलिसांना आरोग्यविषयक सुविधा

सफाळे लायन्स क्लबच्या माध्यमातून पोलिसांना आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि थ्री इन वन वेपोरायझर (वाफ घेण्याचे भांडे) बुधवारी वितरित करण्यात आली.

सफाळे लायन्स क्लबच्या माध्यमातून पोलिसांना आरोग्यविषयक सुविधा
Health facilities to the police through the Safale Lions Club
सफाळे लायन्स क्लबच्या माध्यमातून पोलिसांना आरोग्यविषयक सुविधा

सफाळे लायन्स क्लबच्या माध्यमातून पोलिसांना आरोग्यविषयक सुविधा
 
     

 लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे पोलीस स्टेशन सफाळे तसेच  पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सोनावे पोलीस चौकी आणि केळवे सागरी पोलीस स्टेशन व माकुणसार पोलीस चौकी याठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि थ्री इन वन वेपोरायझर (वाफ घेण्याचे भांडे) बुधवारी वितरित करण्यात आली.

यावेळी लायन्स क्लब सफाळेचे अध्यक्ष तारानाथ वर्तक, सचिव दिनकर वर्तक, खजिनदार मनोज म्हात्रे, उपाध्यक्ष नितीन वर्तक, सहखजिनदार प्रमोद पाटील, केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, लायन्स क्लबचे ज्येष्ठ कार्यकर्ते कमळाकर पाटील, नंदकुमार वर्तक, शरद शिंदे, भालचंद्र चौधरी, अनंत वर्तक, सचिन वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.

संकटे येतात आणि जातात मात्र संकटच मानवाला जीवन जगण्याची दिशा देतात. "वूई सर्व्ह विथ स्माईल" या लायन्सच्या घोषवाक्याप्रमाणे आम्ही सर्व पोलीस वर्ग कार्यरत असून लायन्स क्लबसारख्या सामाजिक संस्था आमचं मनोधैर्य वाढवण्याचे काम करत आहेत. निश्चितच आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे असे मत केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंह पाटील यांनी व्यक्त केले. सफाळे लायन्स क्लबचे अध्यक्ष तारानाथ वर्तक यांनी गेल्या सात महिन्यापासून आपण एका वेगळ्याच संकटातून जात असताना सामान्य माणसाचं संरक्षण करण्याचे  काम करणाऱ्या पोलीस वर्गाला आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे असे सांगून आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. या दोन्ही पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्यांवर कार्यरत असलेल्या पोलिसांना आणि इतर कर्मचाऱ्यांना लायन्स क्लब सफाळे तर्फे थ्री इन वन वेपोरायझर आणि मास्क वाटप करण्यात आले.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील