हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा भूस्खलन

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन झालेय. किन्नरमध्ये झालेल्या या भूस्खलनात बस ढिगाऱ्याखाली दबली गेली.

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा भूस्खलन
Himachal Pradesh Landslides

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा भूस्खलन

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन झालेय. किन्नरमध्ये झालेल्या या भूस्खलनात बस ढिगाऱ्याखाली दबली गेली.

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भूस्खलन झालेय. किन्नरमध्ये झालेल्या या भूस्खलनात बस ढिगाऱ्याखाली दबली गेली. त्यामुळे जवळपास 50-60 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असल्याची शक्यता आहे. आयटीबीपीच्या जवानांनी आतापर्यंत 14 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. याशिवाय 10 मृतदेह देखील सापडले आहेत.(Himachal Pradesh Landslides)

घटनास्थळावर ITBP च्या 3 बटालियनमधील 200 जवान पोहचलेत, अशी माहिती ITBP चे प्रवक्ते विवेक पांडे यांनी दिलीय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी या घटनेत 50-60 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केलीय. सुरक्षित वाचवण्यात आलेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यात आलं. ITBP सोबत NDRF आणि पोलीसही घटनास्थळावर पोहचलेत.

लवकरच परिस्थितीवर नियंत्रण मिळेल, असंही सांगण्यात येतंय. केंद्रीय गृहमंत्रालयाने आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलंय. भारतीय सैन्याने देखील मदतीचा हात देऊ केलाय. या भूस्खलनात एक ट्रक आणि एचआरटीसीच्या 4 बस आल्याचीही माहिती मुख्यमंत्री ठाकूर यांनी दिली. जवानांनी बसच्या चालक आणि वाहकाला वाचवलं आहे. उर्वरित प्रवाशांना वाचवण्याचं काम सुरू आहे.


विशेष म्हणजे भूस्खलन अजूनही सुरू असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. जवळपास 40 बस प्रवाशी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे. यात जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचं पथकही घटनास्थळी पोहचलंय. ढिगाऱ्याखाली दबलेली बस मूरंग-हरिद्वार मार्गावरील आहे.(Himachal Pradesh Landslides)

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्यात 35-40 प्रवाशी होते.