मुरबाडमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक जपतोय पैठणकर कुटुंब

हिंदू-मुस्लीम सिख ईसाई हम सब हे भाई भाई या ब्रीदवाक्य ला खरं ठरवून शासकीय मदतीची वाट न पहाता आपल्या स्वखर्चाने स्मशानभुमीचे पत्रे बसवून दुरुस्ती करून दिल्याने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मुरबाडमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक जपतोय पैठणकर कुटुंब
Hindu Muslim unity in Murbad

मुरबाडमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक जपतोय पैठणकर कुटुंब

हिंदू-मुस्लीम सिख ईसाई हम सब हे भाई भाई या ब्रीदवाक्य ला खरं ठरवून शासकीय मदतीची वाट न पहाता आपल्या स्वखर्चाने स्मशानभुमीचे पत्रे बसवून दुरुस्ती करून दिल्याने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

तालुक्यातील गवाळी गावातील स्मशानभूमीचे पत्रे उडून गेल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे पाहून मुरबाड मधील मुस्लिम समाजातील तरुण साजीद महेबुब पैठणकर यांनी हिंदू-मुस्लीम सिख ईसाई हम सब हे भाई भाई या ब्रीदवाक्य ला खरं ठरवून शासकीय मदतीची वाट न पहाता आपल्या स्वखर्चाने स्मशानभुमीचे पत्रे बसवून दुरुस्ती करून दिल्याने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.(Hindu Muslim unity in Murbad)


मुरबाड तालुक्यातील म्हसा गावाजवळील गवाळी या गावातील स्मशानभुमीचे पत्रे हे उडून गेले होते. त्यामुळे गावातील नागरिकांना मृत् लोकांचे अंत्यसंस्कार उघड्यावरच करावे लागत होते. पावसाळ्यात तर भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.या स्मशानभूमीच्या शेडच्या दुरुस्तीसाठी अनेक प्रयत्न करूनही शासकीय पातळीवर काहीच हालचाली होत नव्हत्या.या स्मशानभूमीची दयनीय अवस्था पाहून गावातील रमेश बांगर यांनी ही बाब साजीद महेबुब पैठणकर यांना सांगीतली.

त्यांनी लगेचच आपला मदतीचा हात पुढे करून पत्रे व इतर सामान आणून दिले. त्याबरोबरच गावातील रमेश बांगर,कचरू बोंद्रे,संतोष आघाणे,जगन साबळे व बाळू शंकर एगडे यांनी विनामूल्य शेडचे काम करून दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीनेही या सर्वांचे आभार मानले आहेत. साजीद पैठणकर यांनी स्वतः मुस्लिम समाजातील असूनसुद्धा यापुर्वी मुरबाड मधील श्रीराम मंदीराच्या बांधकामासाठी नऊ लाख रू.दिले होते. त्याचप्रमाणे मुरबाड शहरातील मुस्लीम कब्रस्थानाचे लाखो रू.खर्च करून एकप्रकारे नंदनवन फुलवले आहे. या कब्रस्थानात लोकं फिरायला सुध्दा येतात.(Hindu Muslim unity in Murbad)

त्यामुळे हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणुन पैठणकर कुटुंबाकडे मुरबाडमध्ये पाहिले जात आहे.

मुरबाड प्रतिनिधी

लक्ष्मण पवार