भारत पेट्रोलियमकडून डिझेलची होम डिलिव्हरी

ज्यांच्याकडे डिझेलवर चालणाऱ्या मशिन्स आहेत किंवा अवजड वाहने आहेत त्यांना FuelKart सेवेतंर्गत डिझेल घरपोच मिळेल.

भारत पेट्रोलियमकडून डिझेलची होम डिलिव्हरी
Home Delivery Service

भारत पेट्रोलियमकडून डिझेलची होम डिलिव्हरी

ज्यांच्याकडे डिझेलवर चालणाऱ्या मशिन्स आहेत किंवा अवजड वाहने आहेत त्यांना FuelKart सेवेतंर्गत डिझेल घरपोच मिळेल.

खासगीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कंपनीकडून FuelKart सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशभरात डिझेलची घरपोच डिलिव्हरी करण्यात येईल. विशेषत: ईशान्य भारतातील राज्यांमध्ये इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. भारत पेट्रोलियमकडून पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये FuelKart देण्यात येईल.(Home Delivery Service)

या राज्यांमध्ये भारत पेट्रोलियमकडून 36 पेट्रोल-डिझेल डिस्पेन्सरही सुरु करण्यात आले आहेत.ज्यांच्याकडे डिझेलवर चालणाऱ्या मशिन्स आहेत किंवा अवजड वाहने आहेत त्यांना FuelKart सेवेतंर्गत डिझेल घरपोच मिळेल. मोबाईल डिस्पेन्सरच्या माध्यमातून डिझेल घरपोच मिळेल. हे डिस्पेन्सर पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे ग्राहकांना भेसळमुक्त डिझेल मिळेल. मोबाईल डिस्पेन्सरमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टम आणि जिओ-फेंसिंग तंत्रज्ञान असेल.भारत पेट्रोलियमची FuelKart सेवा ही रिलायन्सच्या फ्युएल डिस्पेन्सिंग व्यवसायासाठी स्पर्धा मानली जात आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ब्रिटनच्या BP आणि नायरा एनर्जी यांच्या मदतीने Reliance BP Mobility Ltd ही सेवा चालवली जाते. या माध्यमातून पेट्रोल-डिझेलची घरपोच डिलिव्हरी केली जाते. याशिवाय, Repos Energy, Pepfuels, MyPetrolPump, FuelBuddy आणि Humsafar या कंपन्यांकडूनही इंधनाची घरपोच डिलिव्हरी केली जाते.इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने नुकतीच हमसफर इंडिया आणि ओकारा फ्युलोजिक्स या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता इंडियन ऑईल कंपनीला मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात डिझेलची होम डिलिव्हरी करणे शक्य होईल. ही सेवा सुरु झाली असून ग्राहक आता याचा लाभ घेऊ शकतात.

ओकारा फ्युलोजिक्स ही लॉजिस्टिक कंपनी आहे. हमसफर आणि ओकारा फ्युलोजिक्स या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलची घरपोच डिलिव्हरी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आगामी काळात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये अशाप्रकारे इंधनाची घरपोच डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट या कंपन्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे.या नव्या सुविधेतंर्गत ग्राहकांना एका कॅनमधून डिझेल घरपोच केले जाते. रहिवाशी सोसायटी, मॉल, हॉस्पिटल, बँक, कन्स्ट्रक्शन साईट, शेतकरी आणि शैक्षणिक संस्थांना या योजनेमुळे फायदा होऊ शकतो.(Home Delivery Service)

यापूर्वी जास्त प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्यांनाच ही सेवा उपलब्ध होती. मात्र, आता लहान ग्राहकांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.