Gmail इनबॉक्समधले नको असलेले ईमेल्स करा एका फटक्यात डिलिट

वेब-बेस्ड जीमेलसाठी याचा वापर करून अगदी कमी वेळात तुम्ही जीमेल इनबॉक्स रिकामा करू शकता.

Gmail इनबॉक्समधले नको असलेले ईमेल्स करा एका फटक्यात डिलिट
How to Delete unwanted emails

Gmail इनबॉक्समधले नको असलेले ईमेल्स करा एका फटक्यात डिलिट

वेब-बेस्ड जीमेलसाठी याचा वापर करून अगदी कमी वेळात तुम्ही जीमेल इनबॉक्स रिकामा करू शकता.

Gmail च्या inbox दररोज नवनवीन ईमेल्स येत असतात. काही आपल्या कामाच्या असतात तर काही निरुपयोगी असतात. मात्र आपण वेळोवेळी इनबॉक्स क्लीअर  केला नाही तर, ईमेल्सच्या साठ्यात भर पडत जाते आणि एक दिवस ईमेल बाउन्स होत असल्याचं लक्षात येतं. किंवा जीमेलकडून आपल्या अकाउंटची स्टोअरेज  क्षमता संपली असून नवीन स्पेस विकत घ्या असा संदेश येतो.(How to Delete unwanted emails)

 आपल्या लक्षात येतं की जीमेलचे स्टोअरेज रिकामं करणं आवश्यक आहे. हे काम करायला घेतल्यावर ते किती कठीण आहे हे लक्षात येतं.शेकडो, हजारो ईमेल्समधून आवश्यक, महत्त्वाच्या ईमेल्स ठेवणं आणि उरलेल्या एकेक करत डिलिट करणं अतिशय त्रासदायक ठरतं. या त्रासातून सुटका करण्यासाठी एक युक्ती आहे. फक्त ही सुविधा वेब-बेस्ड जीमेलसाठी उपयुक्त आहे. याचा वापर करून अगदी कमी वेळात तुम्ही जीमेल इनबॉक्स रिकामा करू शकता. 

सर्वांत आधी तुम्हाला हवे असलेले आणि जे ईमेल्स तुम्हाला Inbox मध्ये ठेवायचे आहेत,त्याचा विचार केला पाहिजे. याकरता अशा सर्व ईमेल्सना Unread केलं पाहिजे किंवा त्यांना दुसऱ्या एखाद्या फोल्डरमध्ये सेव्ह केलं पाहिजे. त्यानंतर इनबॉक्स उघडून सर्च बारमध्ये ‘is:read’ ही कमांड टाईप करा आणि नंतर एंटर दाबा. जीमेल तुम्ही आधी वाचलेल्या सर्व ईमेल्स वेगळ्या करेल. आता Check Box पर्यायाद्वारे सर्व ईमेल्स सिलेक्ट करा.

जेव्हा आपण 50 किंवा 100 ईमेल्स निवडतो तेव्हा ग्रे कलरमध्ये ते दिसतात आणि त्या सोबत ‘Select all conversations that match this search’ हा पर्याय दिसेल. आता एकदा तुम्ही ठेवू इच्छित असलेले ईमेल्स यात आलेले नाहीत याची खात्री करून घ्या. नंतर टास्कबारवरील Trash Icon वर क्लिक करा. त्यानंतर जीमेलकडून बल्कमध्ये ईमेल्स डिलीट करण्याची खात्री करण्याकरता मेसेज येईल. त्यावरील ओके ऑप्शनवर क्लिक केल्यास सर्व निवडलेल्या ईमेल्स ट्रॅशमध्ये जातील.(How to Delete unwanted emails)

तुम्हाला किती ईमेल डिलीट करायच्या आहेत किंवा कोणत्या ठेवायच्या आहेत, यावर यासाठी लागणारा वेळ अवलंबून आहे.