भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे मैदानावर ‘तो’ उभा राहिला.

भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करता आली नाही.

भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे मैदानावर ‘तो’ उभा राहिला.
IND vs SL second t 20 match

भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे मैदानावर ‘तो’ उभा राहिला.

भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करता आली नाही.

IND vs SL यांच्यातील दुसरा टी 20 सामना खेळवण्यात आला. हा सामना अंतिम समयी प्रचंड रोचक ठरला. भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. पण तरीही श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाज धनंजया डि सिल्वा याने नाबाद 40 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या वादळी माऱ्यापुढे तो तग धरुन मैदानावर खेळत राहिला.(IND vs SL second T20 match)

त्याच्यापुढे अखेर भारतीय गोलंदाजांची कामगिरी फिकी पडली आणि तो श्रीलंकेच्या विजयाला कारण ठरला.धनंजया डि सिल्वा हा मैदानावर कुशाग्र बुद्धीने आणि संयमाने खेळला. त्याच्या डोळ्यादेखत बरोबरीचे सहकारी बाद होत असताना त्याने पाहिले. पण तो डगमगला नाही. तो शेवटपर्यंत लढत राहिला. सामन्याचा कोणताही तणाव न घेता तो मैदानात प्रखरपणे लढताना दिसला. त्याने 34 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. यामध्ये एक चौकार आणि एका षटाकाराचा समावेश आहे.टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना प्रचंड रंगतदार झाला.


अटीतटीच्या या सामन्यात श्रीलंकेने अखेर भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवत सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. श्रीलंकेकडून धनंजया डि सिल्वा याने सर्वाधिक नाबाद 40 धावा केल्या. सिल्वा याची खेळीच आजच्या सामन्यासाठी निर्णायक ठरली. भारताचा खेळाडू कृणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर श्रीलंके विरुद्धचा दुसरा टी 20 सामना एकदिवस पुढे ढकलण्यात आला होता.या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.(IND vs SL second T20 match)

त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने 133 धावांचे आव्हान दिलं. या आव्हान श्रीलंकेने 4 गडी राखत पूर्ण केलं.