आयपीएल स्थगित झाल्यानंतर पोलिसांकडून 2 जणांना बेड्या

आयपीएल पुढे ढकलल्यानंतर आता बायो बबल असतानाही कोरोनाची एन्ट्री कशी काय झाली, यामागील कारणांचा शोध बीसीसीआय घेत आहेत.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर पोलिसांकडून 2 जणांना बेड्या
IPL 2021news

आयपीएल स्थगित झाल्यानंतर पोलिसांकडून 2 जणांना बेड्या

2 bookies Arrested by police after IPL postponed

आयपीएल पुढे ढकलल्यानंतर आता बायो बबल असतानाही कोरोनाची एन्ट्री कशी काय झाली, यामागील कारणांचा शोध बीसीसीआय घेत आहेत. 

कोरोनामुळे  आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने  आयपीएलच्या 14 व्या  मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाठीमागील तीन दिवसांत अनेक खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे कोरोना अहवाल सकारात्मक आढळले, त्यानंतर बायो बबलवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

आयपीएल पुढे ढकलल्यानंतर आता बायो बबल असतानाही कोरोनाची एन्ट्री कशी काय झाली, यामागील कारणांचा शोध बीसीसीआय घेत आहेत. अशातच पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्याची बातमी समोर आली आहे. 

पोलिसांनी ज्या दोन जणांना अटक केलंय, ते बुकी आहेत. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दिल्लीत रविवारी दिल्लीत झालेल्या सामन्यादरम्यान त्यांनी अवैधरित्या मैदानाच घुसण्याचा प्रयत्न केला होता.आरोपींना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, 2 मे रोजी झालेल्या सामन्यादरम्यान अरुण जेटली स्टेडियममध्ये 2 बुकींनी घुसण्याचा प्रयत्न केला, याबद्दल पोलिसांनी या बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींजवळ प्रवेश मिळवण्यासंदर्भातला नकली पास आढळला होता. दोघांच्याहीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आयपीएलचे आयोजन बायो बबलमध्ये करण्यात आले होते आणि केवळ परवानगी असलेल्या लोकांनाच यात सहभागी होता येत होतं.

आयपीएल 2021 च्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 220 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करतावेळी सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 165 धावाच करु शकला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला होता.

अनेक विदेशी खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. सध्याच्या या वातावरणात मायदेशी कसं परतायचं हे त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे. त्यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होऊन बसलीय.

आयपीएलचा बायो-बबल छेदत कोविड संसर्गाच्या अनेक घटना घडल्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) संयुक्त निवेदनात म्हटलंय की,

ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करुन योग्य प्लॅन आखला जाईल आणि त्यांच्या मायदेशी परतण्याविषयी निर्णय घेतला जाईल.