IRCTC कडून रिझर्व्हेशनच्या नियमांत बदल

आयआरसीटीसीकडून रेल्वे बुकिंगच्या ऑनलाईन नियमांत बदल करण्यात आले आहेत.

IRCTC कडून रिझर्व्हेशनच्या नियमांत बदल
IRCTC News

IRCTC कडून रिझर्व्हेशनच्या नियमांत बदल

आयआरसीटीसीकडून रेल्वे बुकिंगच्या ऑनलाईन नियमांत बदल करण्यात आले आहेत.

आयआरसीटीसीकडून रेल्वे बुकिंगच्या ऑनलाईन नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करु शकणार नाही.कोरोना संकटामुळे अनेक प्रवाशांनी दीर्घकाळापासून रेल्वेने प्रवास केला नव्हता. या लोकांसाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.(IRCTC News)

अशा प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करण्यासाठी मोबाईन नंबर व्हेरिफाईड करावा लागेल. इतर प्रवाशांना मोबाईल व्हेरिफिकेशन बंधनकारक नसेल.मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सर्वप्रथम IRCTC च्या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. त्याठिकाणी व्हेरिफिकेशन विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये ईमेल आणि मोबाईल क्रमांक टाकावा. याठिकाणी असलेल्या एडिट ऑप्शनचा वापर करुन तुम्ही ईमेल आणि मोबाईल क्रमांकाचा तपशील बदलू शकता.

तुम्ही व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाईड होईल.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील रेल्वेसेवा ठप्प झाली होती. आता परिस्थिती सामान्य झाल्यानंतर एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन्सची संख्या वाढवण्यात आली आहे.(IRCTC News)

कोरोनाचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरही झाला आहे.