अतिदुर्गम भागातील झेडपीची कांद्रेभुरे शाळा आयएसओ मानांकित

पालघर जिल्हा परिषद सर्व साधारण सभागृहात आयएसओ शाळा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. सफाळे पश्चिमेला असलेल्या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद कांद्रेभुरे शाळेला आय एस ओ मिळाला आहे.

अतिदुर्गम भागातील झेडपीची कांद्रेभुरे शाळा आयएसओ मानांकित
ISO School Honors Ceremony

अतिदुर्गम भागातील झेडपीची कांद्रेभुरे शाळा आयएसओ मानांकित

पालघर जिल्हा परिषद  सर्व साधारण सभागृहात आयएसओ शाळा सन्मान सोहळा नुकताच पार  पडला. सफाळे पश्चिमेला असलेल्या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद  कांद्रेभुरे शाळेला आय एस ओ मिळाला आहे. 

रविंद्र घरत पालघर प्रतिनिधी:

पालघर जिल्हा परिषद  सर्व साधारण सभागृहात आयएसओ शाळा सन्मान सोहळा नुकताच पार  पडला. सफाळे पश्चिमेला असलेल्या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद  कांद्रेभुरे शाळेला आय एस ओ मिळाला आहे.  प्रत्येक शाळा ही गुणवत्तापूर्ण व भौतिक सुविधांनी परिपूर्ण बनावी यासाठी या वर्षांपासून मिशन ISO शाळा हा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे.त्यात सफाळे परिसरातील अतिदुर्गम भागात असलेली जिल्हा परिषद कांद्रेभुरे शाळेस एकमेव शिक्षिका सौ.चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या शाळेतील स्वयंसेवक टीम आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता व व्यवस्थापनाचे आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाले आहे.असे मानांकन मिळवणारी पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे शाळा जी एक शिक्षिका असतानाही आय.एस.ओ.करण्यात सक्षम ठरली आहे.(ISO School Honors Ceremony)


         यासाठी सर्व निकष पूर्ण करायचे आव्हान असताना जागृती चौधरी  ह्यांनी आपल्या शाळेची स्वयंसेवक टीम,ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी ह्यांना एकत्र घेऊन त्यांच्या मदतीने हे आव्हान पूर्ण करण्याचा केलेला प्रयत्न अधिक कौतुकास्पद आहे. 
        पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद कांद्रेभुरे शाळेत विविध प्रकारचे नवोपक्रम,विविध सहशालेय कार्यक्रम, संपूर्ण तंबाखू मुक्त शाळा, शालेय परिसर सुशोभीकरण, परसबाग,फळबाग,प्रयोगशाळा, तसेच  लॉकडाऊन कालावधीमध्ये चालू असलेला  महत्वाचा उपक्रम म्हणजे "विद्यार्थी माझा गुरू"हा उपक्रम जागृती चौधरी  ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांमार्फत कोरोना कालावधीत शाळा बंद असतानाही कांद्रेभुरे शाळेतील सातही वर्गाच शिक्षण उत्तमपणे चालू होतं.तसेच अजून खूप काही नाविन्यपूर्ण उपक्रम या शाळेमध्ये राबवण्यात आले आहेत.


        या शाळेतील प्रमुख शिक्षिका चौधरी ह्यांनी आपल्या परिचयातील विविध संस्थेमार्फत कांद्रेभुरे शाळेस गेल्या ५ वर्षात जवळपास १५ लाख निधी मिळवला आहे.या सर्व दानशूर संस्था तसेच  शाळा व्यवस्थापन समिती,स्वयंसेवक टीम, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ ह्या सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या सर्व भौतिक सुविधा कोविड सारख्या महामारीच्या काळात ही पूर्ण करून संपूर्ण शाळेचा कायापालट करून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.एवढं सर्व स्वतःच्या हिमतीवर करूनही  चौधरी मॅडम हा पुरस्कार घेण्याकरिता गेल्या नाही.

तिथे न जाण्याच कारण एकच की त्यांना वाटत एवढं चांगलं कार्य करूनही शिक्षण विभागात काही सहकारी शिक्षकच अधिकाऱ्यांना खोटी माहिती देत असल्याने ह्या शिक्षिकेमुळे त्या शाळेला शिक्षक मिळणार नाहीत असा आरोप सक्षम अधिकाऱ्यांकडून केला गेला त्यामुळे हा पुरस्कार घेण्यास त्या स्वतःला पात्र समजल्या नाहीत म्हणून चौधरी यांच्या  वतीने हा पुरस्कार  शालेय व्यवस्थापन अध्यक्ष विष्णू पाटील आणि स्वयंसेवक प्रमुख दुर्गेश भोईर यांना पुरस्कार वितरणाच्या दिवशी चौधरी मॅडमचे प्रतिनिधित्व करून सन्मानाचा मान मिळाला.शाळा ISO करण्यामागचा प्रमुख शिक्षिका चौधरी मॅडम ह्यांचा उद्देश म्हणजे शासनाकडून शाळेची मंजूर पदे भरली जातील.जर इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग व कायमस्वरूपी एकच शिक्षिका असताना iso नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा राखण्यात शाळा यशस्वी होईल का असा महत्वाचा प्रश्न गावापुढे आहे.(ISO School Honors Ceremony)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/