कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४५ हजारांचा टप्पा
३९४ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू ४५,१७५ एकूण रुग्ण तर ८८१ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३०७ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ४५ हजारांचा टप्पा
३९४ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू
४५,१७५ एकूण रुग्ण तर ८८१ जणांचा आतापर्यंत मृत्यू
तर २४ तासांत ३०७ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ४५ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३९४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या ३९४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४५,१७५ झाली आहे. यामध्ये ३५०८ रुग्ण उपचार घेत असून ४०,७८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३९४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ८७, कल्याण प – ११३, डोंबिवली पूर्व १२६, डोंबिवली प- ५८, मांडा टिटवाळा – ४, मोहना – ३, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९२ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण,ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________
Also see : संशयित मीटर दडवून मॉल चालकाची महावितरणच्या भरारी पथकाला दमदाटी
https://www.theganimikava.com/The-mall-driver-hid-the-suspected-meter-and-pushed-the-MSEDCL-team