बीड जिल्ह्य़ातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात ईडीमार्फत चौकशी करून तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील यांना अटक करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड जिल्ह्य़ातील विविध मंदिर ,मशिद, दर्गाह आदि.धार्मिक स्थळांच्या ईनामी जमिन बोगस दस्तावेज तयार करून बेकायदेशीर रित्या आधिकारात नसताना खाजगी व्यक्तिच्या नावावर केल्याबद्दल तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील, नरहरी शेळके यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी.

बीड जिल्ह्य़ातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात ईडीमार्फत चौकशी करून तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील यांना अटक करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
Inami Devasthan land Case

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड जिल्ह्य़ातील विविध  मंदिर ,मशिद, दर्गाह आदि.धार्मिक स्थळांच्या ईनामी जमिन बोगस दस्तावेज तयार करून बेकायदेशीर रित्या आधिकारात नसताना खाजगी व्यक्तिच्या नावावर केल्याबद्दल तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील, नरहरी शेळके यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी  तसेच बोगस जमिनींचे बनावट फेरफार रद्द करण्यात येऊन देवस्थानच्या नावे नोंदि करण्यात याव्यात  व दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधित प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर  , शेख युनुस च-हाटकर,संदिप जाधव, डाॅ.संजय तांदळे यांच्या नेतृत्वाखाली   विविध देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसलेले आहेत.(Inami Devasthan land Case)बीड जिल्ह्य़ातील विविध धार्मिक स्थळांच्या ईनामी देवस्थान जमिनी आधिकारात नसताना बनावट दस्तावेज तयार करून खिदमतमास जमिनी मदतमास दाखवून खाजगी व्यक्तींच्या नावे करण्याचे रॅकेट तत्कालीन उपजिल्हाआधिकारी नरहरी शेळके, प्रकाश आघाव पाटील तसेच स्थानिक राजकीय पुढारी, महसुल प्रशासनातील आधिकारी तहसिलदार, मंडळ आधिकारी, तलाठी यांनी संगनमतानेच शासनाची दिशाभूल केली असून आर्थिक नुकसान व भाविकांच्या भावनेला ठेस पोहचवली असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे.

यासाठी अंबाजोगाई येथील थोरले दत्तात्रेय देवस्थान स्वाती लोमटे ,वर्षाताई लोमटे,  सुलोचना लोमटे, लक्ष्मीताई वडवणकर, राम लोमटे, तसेच रूईनालकोल ता.आष्टी.जि.बीड  येथिल शेख महंमद दर्गाह देवस्थान अनिश शेख, जमिरशेख, खडकत  ता.आष्टी.जि.बीड  येथील विठोबा देवस्थान,अतुल शिंदे, कल्याण काळे, सुनिल पवार, मौजे पालवण  ता.जि.बीड येथील श्रीराम देवस्थान संदिप शेळके,रावसाहेब शेळके  आदिठीकाणचे तक्रारदार आंदोलनास उपस्थित होते.(Inami Devasthan land Case)