भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार

अझानी तुम्हाला 2 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 पर्यंत घेऊन जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार
India first electric supercar

भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार

अझानी तुम्हाला 2 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 पर्यंत घेऊन जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. 

ऑटोमोटिव्हच्या विश्वात सुपरकार्सला सर्वात शक्तिशाली प्रकल्पांपैकी एक मानले जाते. जर सुपरकार इलेक्ट्रिफाईड अर्थात विद्युतीकृत असेल तर त्याचे मूल्य आणखी वाढते. मीन मेटल मोटर्स नावाच्या भारतीय स्टार्टअपने अझानी नावाची सुपरकार बनवली आहे. ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार आहे. अझानी सुपरकार पूर्णपणे Mclarenने प्रेरित दिसते. त्याची फ्रंट प्रोफाईल बरीच गोंडस आणि आक्रमक दिसते. दुसरीकडे, त्याचे तीक्ष्ण हेडलॅम्प्स पूर्णपणे मोठ्या एअर व्हेंट्समध्ये इंटिग्रेटेड आहेत.(India first electric supercar)


बोनट चांगले कव्हर करण्यात आले आहे. वरच्या दिशेने जाणारी शोल्डर लाईन, काळा कॉकपिट, कर्वी आणि वायुगतिकीय मागील विभाग सुपरकारच्या व्हिज्युअल्समध्ये मोठी भर घालतो. अझानीला मागील बाजूस एक पातळ एलईडी पट्टी आहे, जी टेललाईटच्या स्वरूपात आहे. अझानी तुम्हाला 2 सेकंदांपेक्षा कमी वेळात 0 ते 100 पर्यंत घेऊन जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कारची टॉप स्पीड ताशी 350 किमी इतकी आहे.

सुपरकारमध्ये 1000 एचपी निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर लावण्यात आली आहे. उत्पादक कंपनीने दावा केला आहे की ही कार एकाच चार्जमध्ये 700 किमीची रेंज देते. स्टार्टअपचे असेही म्हणणे आहे की, कंपनी 2022 च्या मध्यावर पहिला प्रोटोटाईप आणेल. त्यावेळी त्याची किंमत 1,20,000 डॉलर्स इतकी असेल.कंपनीचे म्हणणे आहे की ही इलेक्ट्रिक सुपरकार सूक्ष्म सुविधेवर बनवली जाईल, जी पारंपारिक ऑटोमोबाईल उत्पादन सुविधेच्या किंमतीच्या पंचमांशपेक्षा कमी असेल. 



याच्या मदतीने उत्पादक कंपनी कारला अधिक वेगाने बाजारात दाखल करेल. स्टार्टअप 2030 पर्यंत 750 अब्ज खर्चाची 34 दशलक्ष ईव्ही लॉन्च करणार आहे. ब्रँडने असेही म्हटले आहे की, 22 सदस्यांची टीम सध्या संशोधन, विकास, डिझाईन, एरोडायनामिक्स, अभियांत्रिकीसह यूके, जर्मनी आणि यूएसमधील तांत्रिक भागिदारांसोबत काम करीत आहे. अझानीच्या निर्मितीबद्दल बोलताना मीन मेटल मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सार्थक पॉल म्हणाले की, ज्या उद्योगात ईव्हीला मोठा धक्का मिळत आहे.(India first electric supercar)

त्या उद्योगात आपली ताकद दाखवून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.