कु.काजल शरद बनसोडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
प्रताप नगर विभागातील कु.काजल शरद बनसोडे ला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

कु.काजल शरद बनसोडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
प्रताप नगर विभागातील कु.काजल शरद बनसोडे ला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
मुंबई, गणेश हिरवे:
जोगेश्वरी पुर्व, प्रताप नगर विभागातील कु.काजल शरद बनसोडे ला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.संपूर्ण भारतातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(I I M) शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कॉलेजमधील एम बी ऐ(M B A), शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाज प्रबोधनात्मक उत्कृष्ट व दर्जेदार जाहिरात बनविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये कुमारी काजल शरद बनसोडे हिने भाग घेऊन उत्कृष्टरित्या दर्जेदार जाहिरातीचे चित्रण सादर करून करून प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला आहे.यापूर्वी तिला शिक्षण क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ती आय आय एम (I I M) मध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.