पेट्रोल डिझेल विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

इंडियन ऑईलला मिळणाऱ्या मार्जिनमध्येही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कंपनीला एका बॅरलमागे 1.98 डॉलर्स इतके रिफायनिंग मार्जिन मिळत होते.

पेट्रोल डिझेल विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?
Indian Oil Petrol

पेट्रोल डिझेल विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?

इंडियन ऑईलला मिळणाऱ्या मार्जिनमध्येही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कंपनीला एका बॅरलमागे 1.98 डॉलर्स इतके रिफायनिंग मार्जिन मिळत होते.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑईलकडून नुकताच तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला. एप्रिल-जून तिमाहीत इंडियन ऑईलचा नफा दुप्पट झाला आहे. या तिमाहीत कंपनीने 5941 कोटींचा नफा कमावला. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 1911 कोटींचा नफा झाला होता. इन्व्हेंट्री गॅस आणि पेट्रोकेमिकल मार्जिनमुळे नफा वाढल्याचे इंडियन ऑईलकडून सांगण्यात आले.गेल्या तिमाहीत इंडियन ऑईलला एकूण 1,55,056 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

गेल्यावर्षी हाच महसूल 88,939 कोटी रुपये होता. एप्रिल- ते जून या काळात इंडियन ऑईलने 20.325 कोटी टन उत्पादनांची विक्री केली. या काळात रिफायनिंग उत्पादन 16.719 कोटी टन इतके राहिले तर पाईपलाईन नेटवर्क उत्पादन 19.875 मिलियन टन इतके राहिले.यंदाच्या वर्षात इंडियन ऑईलला मिळणाऱ्या मार्जिनमध्येही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कंपनीला एका बॅरलमागे 1.98 डॉलर्स इतके रिफायनिंग मार्जिन मिळत होते.

हेच मार्जिन आता 6.58 डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहे. सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरीचा टप्पा ओलांडला असून डिझेलचीही त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे.

सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.