ओंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आभासी परिषद संपन्न

ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी वाणिज्य मंडळ, विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "कोव्हीड -१९ माहामारीचा अर्थव्यवस्था, शाश्वत विकास आणि जागतिक समाज आरोग्य यांच्यावर पडलेला प्रभाव" या विषयावर आंतरराष्ट्रीय आभासी परिषद घेण्यात आली.

ओंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आभासी परिषद संपन्न
International Virtual Conference

ओंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आभासी परिषद संपन्न

ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी वाणिज्य मंडळ, विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "कोव्हीड -१९ माहामारीचा अर्थव्यवस्था, शाश्वत विकास आणि जागतिक समाज आरोग्य यांच्यावर पडलेला प्रभाव" या विषयावर आंतरराष्ट्रीय  आभासी परिषद घेण्यात आली.

रविंद्र घरत पालघर:

ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी वाणिज्य मंडळ, विज्ञान मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "कोव्हीड -१९ माहामारीचा अर्थव्यवस्था, शाश्वत विकास आणि जागतिक समाज आरोग्य यांच्यावर पडलेला प्रभाव" या विषयावर आंतरराष्ट्रीय  आभासी परिषद घेण्यात आली. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. व्ही. जी. पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विनोद सोनवणे यांनी सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे आणि सर्व सहभागींचे स्वागत करुन महाविद्यालय या आदिवासी भागात करित असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.(International Virtual Conference)

आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक प्रा. राहुल बनसोडे यांनी केले.  या प्रसंगी डॉ चेतना पाटील मॅडम यांनी संस्थेची भुमिका सांगुन, आता पर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला.या परिषदेची रचना उद्घाटन, तिन सत्रे आणि समारोप अशा प्रकारे करण्यात आली होती.  या आंतरराष्ट्रीय परिषदेचे बीजभाषण दक्षिण आफ्रिकेचे डॉ. पंकज गिरासे यांनी केले. डॉ. पंकज गिरासे यांनी आपल्या बीजभाषणात कोवीड-१९ आणि क्षय रोग यांचा  सहसंबंध यावर भाष्य करत असताना क्षयरोगाबाबत जागरूकता आणण्यासाठी मेडिसिनल रसायन संशोधन क्षेत्राची काळजी गरज असल्याचे प्रतिपादन केले. दुसऱ्या सत्रात सरदार पटेल विद्यापीठ गुजरात येथील अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. किंजल अहिर यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवर कोवीड-१९ चा काय प्रभाव पडला यावर प्रकाश टाकला. तर तिसऱ्या सत्रात दिल्ली येथील श्री. किशोर हिराडे यांनी कोवीड-१९ चा अर्थव्यवस्था, अविरत विकास आणि आरोग्यावर झालेला परिणाम यावर विचार मांडले.

 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमास तलासरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या कोवीड-१९ चा आदिवासी भागात झालेला परिणाम यावर भाष्य करुन, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचे अभिनंदन केले.  या प्रसंगी डॉ. परशुराम मस्के,  डॉ. चेतना पाटील आणि डॉ. चंद्रकांत गायकवाड हे सत्र अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.  तर डॉ. योगेश पाटील, प्रा. अनिल पठाडे व प्रा. संतोष धामोणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर प्रा. लक्ष्मण पराड, प्रा. रोहीनी बोरसे आणि प्रा. विशाल निकम यांनी आभार व्यक्त केले.  या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आभासी  झुम आणि  युट्यूब माध्यमातून प्रसारणाची धुरा प्रा. सचिन इंगोले आणि प्रा. विशाल निकम यांनी सांभाळली.  डॉ. तेजेंद्रसिंग राजपूत यांनी या परिषदेचे सह कन्व्हेनर म्हणून काम पाहिले. ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या परिषदेचे सुत्रसंचलन प्रा. भिमराव बनसोडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. राहुल बनसोडे यांनी केले.(International Virtual Conference)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/