जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून किन्नर महिलांचा सत्कार, सत्कार सोहळ्यात सपना आणि बाळूचा अनोखा विवाह पत्रकार संघ लावून देणार

दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. मात्र कायम उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी किन्नर महिलांना सातत्याने अवमान सहन करावा लागतो. त्यांना शासकीय पातळीवर कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून किन्नर महिलांचा सत्कार, सत्कार सोहळ्यात सपना आणि बाळूचा अनोखा विवाह पत्रकार संघ लावून देणार
International Women Day

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून किन्नर महिलांचा सत्कार, सत्कार सोहळ्यात सपना आणि बाळूचा अनोखा विवाह पत्रकार संघ लावून देणार

दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. मात्र कायम उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी किन्नर महिलांना सातत्याने अवमान सहन करावा लागतो. त्यांना शासकीय पातळीवर कोणत्याही सुविधा मिळत नाहीत.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. मात्र कायम उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी किन्नर महिलांना सातत्याने अवमान सहन करावा लागतो. त्यांना शासकीय पातळीवर कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यांना देखील सन्मान मिळावा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाच्या वतीने रविवार दिनांक 6 मार्च रोजी किन्नर महिलांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी दिली.(International Women Day)


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सामाजिक हित समोर ठेवून राबवले जातात. मंगळवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून जगभर महिलांचे कौतुक केले जाते, ते झाले देखील पाहिजे. मात्र नैसर्गिक दृष्ट्या ज्यांच्या पदरी धड पुरुषत्व आलेले नाही किंवा पूर्णत्व स्त्रीत्व लाभलेल नाही, अशा तृतीयपंथी किन्नर महिला आज देखील कायम उपेक्षित आहेत.


 ते जोपर्यंत जगतात तोपर्यंत कायम समाजाच्या नजरेतून, बोलण्यातून अपमानित होत राहतात. त्यांच्यासोबत नको ते अत्याचार देखील होतात, मात्र त्यांना न्याय मागण्यासाठी कुठेही हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. त्यांना कोणीही काम देत नाही. शासन त्यांना कसल्याही सुविधा देत नाही. मग त्यांनी जगायचे कसे ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांच्या प्रश्नांना शासन आणि प्रशासन स्तरावर न्याय मिळावा या हेतूने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बीड जिल्हा शाखेच्या वतीने बीड येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील किन्नर महिलांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

 त्याच बरोबर त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी खुले व्यासपीठ देण्यात येणार आहे.त्यांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संघ भविष्यात पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मार्गदर्शक संतोष मानूरकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पत्रकार संघ सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती पत्रकार संघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती प्रतिभा गणोरकर आणि शेख आयेशा रफिक यांनी दिली आहे.

सपना आणि बाळू यांचा विवाह पत्रकार संघ लावून देणार किन्नर महिलांचे फक्त शोषण केले जाते. त्यांची आर्थिक लूट करून फसवणूक सुद्धा अनेक वेळा केली जाते.मात्र बीडमध्ये सपना नामक एक किन्नर महिला बाळू नामक युवकासोबत मागील तीन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.त्यांना कायदेशीर विवाह करायचा आहे, मात्र प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.


 दोघांच्याही घरातून आणि समाजातून प्रचंड विरोध होत आहे त्याला न जुमानता हे जोडपे संघर्ष करत आहे.त्यांना न्याय हक्क देण्यासाठी पत्रकार संघ पुढाकार घेणार आहे.त्यांना अधिकृत विवाह बंधनाचा कायदेशीर हक्क देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असा प्रयोग बीड जिल्ह्यातच नव्हे तर कदाचित मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच होण्याची शक्यता आहे.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित रविवार दिनांक 6 मार्च रोजी किन्नर महिलांच्या सन्मान सोहळ्यात हा आगळा वेगळा विवाह सर्वांच्या साक्षीने लावण्यात येणार आहे.

किन्नर महिलांच्या सन्मानासाठी दानशूरांनी पुढे यावे बीड जिल्ह्यातील किन्नर महिलांना साडी चोळी भेट देऊन रविवार दिनांक 6 मार्च रोजी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. त्याच बरोबर या सोहळ्यामध्ये सपना आणि बाळू या प्रेम वीरांचा शानदार विवाह सोहळा करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी दानशूरांनी आपल्यापरीने सढळ हाताने मदत करावी. सदरील मदत वस्तू रुपात, दागिने स्वरूपात, अथवा रोख स्वरूपात करू शकतात. मदतीसाठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक सूर्योदयच्या पत्रकार शेख आयेशा रफिक यांच्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल नंबर 7030149322.

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/