जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर
जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.

जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर
जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.
जेईई मेन तिसऱ्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. एनटीएनं 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत.कर्णम लोकेश, दुग्गीनेनी वेंकट पनीश, आंध्र प्रदेशातील पासला वीरा शिवा आणि कांचनपल्ली राहुल नायडू, वैभव विशाल , अंशुल वर्मा , रुचिर बन्सल आणि प्रवर कटारिया, हर्ष आणि अनमोल, गौरब दास, पोलू लक्ष्मी साई लोकेश रेड्डी , मदुर आदर्श रेड्डी आणि वेलावली वेंकट आणि उत्तर प्रदेशातून पाल अग्रवाल आणि अमैया सिंघल या विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवले आहेत.(JEE Main 2021 Result Declared)
-निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
-वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
-तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या
नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन तिसऱ्या सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती.(JEE Main 2021 Result Declared)
ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.