प्रजाकसत्ताक दिनी गावा- गावात होणार होणार जल जीवन मिशन विषयी जनजागृती

केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल महत्वकांशी कार्यक्रमा विषयीची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये होऊन गावात लोक चळवळ निर्माण व्हावी या हेतूने प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांमध्ये जल जीवन कार्यक्रमाबद्दल जाणीव जागृती करण्यात येणार

प्रजाकसत्ताक दिनी गावा- गावात होणार होणार जल जीवन मिशन विषयी जनजागृती
Jal Jeevan Mission

प्रजाकसत्ताक दिनी गावा- गावात होणार होणार जल जीवन मिशन विषयी जनजागृती

केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल महत्वकांशी कार्यक्रमा विषयीची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये होऊन गावात लोक चळवळ निर्माण व्हावी या हेतूने प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांमध्ये जल जीवन कार्यक्रमाबद्दल जाणीव जागृती करण्यात येणार.

रविंद्र घरत पालघर:

केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल महत्वकांशी कार्यक्रमा विषयीची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये होऊन गावात लोक चळवळ निर्माण व्हावी या हेतूने प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांमध्ये जल जीवन कार्यक्रमाबद्दल जाणीव जागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.(Jal Jeevan Mission)
26 जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभामध्ये कोविडचे नियम पाळून ग्रामस्थांना  जलजीवन मिशन या योजनेची माहीती देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. पालघर जिल्ह्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येणार आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बहुसंख्य गावामध्ये आजही महिला व मुलींना नाईलाजास्तव पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून मुक्तीसाठी केंद्र शासनाच्यावतीने जल जीवन मिशन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमतून प्रत्येक कुटूबांला प्रती व्यक्ती  प्रती दिवस 55 लिटर प्रमाणे बारमाही स्वच्छ व शुद्ध पाणी घरोघरी नळाद्वारे देण्यात येणार आहे. पाणी गुणवत्ता तपासणी स्थानिक पातळीवर होण्याकरीता प्रत्येक गावातील 5 महिलांना पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
     गावा गावामध्ये  जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे.ग्रामस्थांनी जल जीवन मिशन योजना राबविणे, चालविणे, देखभाल दुरूस्ती करीता पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावातून नळजोडणीच्या मोहिमेला गावकऱ्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हावी म्हणून जल जीवन मिशनमध्ये लोक वर्गणीची तरतूद करण्यात आली आहे. सदरची लोकवर्गणी  आर्थिक किंवा श्रमदानाच्या स्वरूपात असणार आहे.नळ जोडणी योजना पुर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी लोकवर्गणी म्हणून दिलेला निधी शासन पुन्हा नळपाणीपुरवठा योजनेच्या खात्यात जमा करणार असून सदर निधी योजनेच्या  देखभाल व दुरूस्तीसाठी वापरण्यात येणार आहे. नळजोडणीच्या कामासाठी ग्रामपंचायतीमधील उपलब्ध असलेल्या 15 व्या आयोगाच्या निधीचा उपयोग करावयाचा आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने या कामामध्ये सक्रिय व प्राधान्याने सहभाग घेणे गरजेचे आहे असे आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी केले आहे.(Jal Jeevan Mission)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/