जळगावच्या पाटील बंधूंची डाळिंबातून 50 लाखांची कमाई

ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आणि दुष्काळावर मात करत डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे.

जळगावच्या पाटील बंधूंची डाळिंबातून 50 लाखांची कमाई
Jalgaon farmer

जळगावच्या पाटील बंधूंची डाळिंबातून 50 लाखांची कमाई

ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आणि दुष्काळावर मात करत डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे.

 लॉकडाऊनमुळे अनेक जणांनी शेतीचा रस्ता धरला. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानं सावरलं आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आणि दुष्काळावर मात करत डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांची नावं नवनीत दत्तात्रय पाटील आणि दिलीप दत्तात्रय पाटील अशी आहेत.(Patil brothers from Jalgaon earn Rs 50 lakh from pomegranate)


मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा येथील शेतकरी नवनीत पाटील आणि दत्तात्रय पाटील यांनी कोरोनावर आणि दुष्काळावर मात करत जाळिंबाची लागवड केली. नवनित दत्तात्रय पाटील ,दिलीप दत्तात्रय पाटील या दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी सर्व सदस्यांनी एकत्र त्यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यानं त्यांनी 7 एकर शेतात डाळिंबाचं 900 किंटल उत्पन्न घेतलं आहे. पाटील बंधूंना डाळिंबाच्या शेतीतून पन्नास लाखांचं विक्रमी उत्पन्न मिळालं आहे.


नवनीत पाटील आणि दिलीप पाटील यांनी एकत्रित येत केलेल्या शेतीमुळे इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा राहिला आहे. पाटील यांच्या शेतातील डाळिंब आता बांग्लादेशला देखील निर्यात केली जाणार आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहकार्यानं हे शक्य झाल्याचं पाटील बंधू सांगतात.मुक्ताईनगर तालुक्यातील डाळिंब आता थेट बांगलादेशात जाणार आहेत. पंढरपूर येथील व्यापाऱ्याच्या माध्यमातून जाणार असल्याची माहितीदेखील नवनीत पाटील यांनी दिली. 


आपण नियोजन योग्यरीत्या केले तर शेतात काही उत्पन्न घेऊ शकतो. फळ बागायत वाढल्यामुळे हालाखीच्या परिस्थितीवर मात केली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्या शेतीचा विस्तार आता शंभर एकरापर्यंत पोहोचला आहे.नवनीत पाटील आणि दिलीप पाटील यांच्या शेतात तालखेडा गावातील आणि मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागातील 40 ते 50 मजूर देखील त्यांच्या शेतात रोज कामाला आहेत.(Patil brothers from Jalgaon earn Rs 50 lakh from pomegranate)

पाटील बंधूंनी डाळिंब बागायत आणि इतर शेतीच्या कामाच्या माध्यमातून इतरांना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला आहे.