2024 साली कल्याण- मुरबाड रेल्वे धावणार , जन आशिर्वाद यात्रेत केद्रीय मंत्री पाटील यांचे मुरबाडकरांना आश्वासन.
मुरबाड रेल्वे 2024ला धावणार असे आश्वासन केद्रीय राज्य पंचायतराज मंत्री कपील पाटील यांनी मुरबाड शहरातील शिवाजी चौकात हजारो मुरबाड करांच्या उपस्थित आश्वासन दिले.

2024 साली कल्याण- मुरबाड रेल्वे धावणार , जन आशिर्वाद यात्रेत केद्रीय मंत्री पाटील यांचे मुरबाडकरांना आश्वासन.
मुरबाड रेल्वे 2024ला धावणार असे आश्वासन केद्रीय राज्य पंचायतराज मंत्री कपील पाटील यांनी मुरबाड शहरातील शिवाजी चौकात हजारो मुरबाड करांच्या उपस्थित आश्वासन दिले.
कपील पाटील याची मंत्री पदी निवड झाल्यानंतर मुरबाड तालुक्यात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुरबाड कराचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. सतत पडणा-या पावसाची पर्वा न करता हजारो मुरबाडकर कपील पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थीत होते. तिन हात नाका येथून ह्या जन आशियाई यात्रेला सुरवात झाली. मिरवणूकी साठी आणलेल्या रथात न बसता जनते बरोबर चालत फिरुन जनतेचे आशीर्वाद घेतले.(Jan Ashirwad Yatra)
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेटकर , हुतात्मा हिराजी पाटील यांच्या चरणी नतमस्तक होऊन मुरबाड शहरातील जोगेश्वरी मंदिर , हनुमान मंदीरात बाहेरून दर्शन घेऊन शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन उपस्थिती जनतेशी संवाद साधला .या वेळी हनूमान मंदिरात वैश्य समाजाच्या वतीने पाटील यांचे स्वागत केले तर ठाणे जिल्हा महिला मोर्च्याच्या अध्यक्षा शितल तोंडलीकर यांनी हजार महीलांच्या उपस्थीत जोगीश्वरी मंदीरा जवळ पाटील यांचे औक्षण केले. शिवाजी चौकात माजी मंत्री,जगन्नात पाटील, आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगंबर विशे, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, विश्वनात पाटील , यांच्या उपस्थितीत मंत्री पाटील यांनी उपस्थीत जनतेला मार्गदर्शन केले.
या वेळी मुरबाडकरांचे अधूरे राहिलेल्या श्वप्नाला हात घालीत 2024 साली कल्याण - मुरबाड रेल्वे धावणार असे आश्वासन दिले.या वेळी उपस्थितांनी जोरात घोषणा देऊन दिलेल्या आश्वासनाचे स्वागत केले. जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसात पहाता 2024 साली पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील याची खात्री दिली. तुम्ही मला खासदार केले म्हणूनच मोदींनी मला मंत्री केले असी क्रुतज्ञता व्येक्त केली. कल्याण- माळशेज घाट चौपदरी करण , माळशेज घाटातील बोगदा, घाटातील काचेचा ब्रीज अशा अनेक कामांना उजाळा देऊन पुर्ण करण्याचे आश्वासन जनतेला दिले. मुरबाड शहरात भव्यदिव्य पत्रकार कक्ष तयार करण्याचे.आश्वासन या वेळी दिले.(Jan Ashirwad Yatra)
तारपा न्रूत्य,कोळी न्रूत्य,लेझीन न्रुत्य व बँन्डच्या आवाजाने मुरबाड शहर दनानून गेले होते.
बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत