जयभीम (मुव्ही) चित्रपट का पहाणे आवश्यक आहे

आत्ता पर्यंतचे चित्रपट हे मारधाड, प्रेम,खून,बलात्कार, रंगेल शान शौकिन पाटील,मदिरा व मदिराक्षीच्या,नाचणाऱ्या कळवातनीच्या पायी स्वतः च्या धर्मपत्नीचे, वाटोळे करून घेणारा, संसार उद्ध्वस्त करणारा,जमिनी विकणारा पाटील "व्हिलन " म्हणून रंगवला.

जयभीम (मुव्ही) चित्रपट का पहाणे आवश्यक आहे
Jay bheem movie

जयभीम (मुव्ही) चित्रपट का पहाणे आवश्यक आहे

आत्ता पर्यंतचे चित्रपट हे मारधाड, प्रेम,खून,बलात्कार, रंगेल शान शौकिन पाटील,मदिरा व मदिराक्षीच्या,नाचणाऱ्या कळवातनीच्या पायी स्वतः च्या धर्मपत्नीचे, वाटोळे करून घेणारा, संसार उद्ध्वस्त करणारा,जमिनी विकणारा पाटील "व्हिलन " म्हणून रंगवला.

अनंत सरवदे, सेवा निवृत तहसिलदार बीड :आत्ता पर्यंतचे चित्रपट हे मारधाड, प्रेम,खून,बलात्कार, रंगेल शान शौकिन पाटील,मदिरा व मदिराक्षीच्या,नाचणाऱ्या कळवातनीच्या पायी स्वतः च्या धर्मपत्नीचे, वाटोळे करून घेणारा, संसार उद्ध्वस्त करणारा,जमिनी विकणारा पाटील "व्हिलन " म्हणून रंगवला. उभा केला .अर्थातच त्यांतील बहुतांशी दिग्दर्शक वक्र दृष्टीचे उच्चभ्रू.त्यांचा प्रचंड "गल्ला" भरला पण वास्तवातला पाटील पार "मारला"पण "जयभीम " हा चित्रपट दाक्षिणात्य दिग्दर्शक टी. जे.ग्यानवेलने तामिळनाडूच्या " वेल्लूपुरम" जिल्ह्यातील "ईरूला"  आदिवासिंच्या वास्तव जीवनावर आधारित"कुड्डूलोर" येथें 1993 साली घडलेल्या Real Life Story वर आधारित आहे.(Jay bheem movie)

अनेक वर्षे मानवी हक्कासाठी लढणारा जेष्ठ वकील ऍड. के. चंदरु "His fight for human wright "  ज्याने त्यांच्या वकिलीच्या काळात एक रुपयाही कोणाकडून फिस घेतली नाहीं.हेच के. चंदरू दिनांक 31 जुलै 2006ते 9 नोव्हेंबर 2013 पर्यंत मद्रासच्या उच्च न्यायालयात "न्यायाधीश " म्हणून कार्यरत होते. तेंव्हा त्यांनी 96 हजार अशी प्रकरणे निकाली काढली.जयभीम मुव्हीतील एक संवाद म्हणजे " Law is the very powerful weapon" ने संविधान  व कायदा हे न्याय मिळवून देण्यासाठी शक्तिशाली शस्त्र आहे.या मुव्ही मध्यें मारधाड,हिंसा,बलात्कार, खून,अथवा अतिरंजितपणा नाहीं.

  आजही उंदीर पकडून उपजीविका करणारी "ईरुला आदिवासी " जमात वास्तवात आहे. जेंव्हा श्रीमंत सरपंचाच्या घरांत साप निघाल्यावर तो मारण्यासाठी  "राजा कन्नू " या आदिवासीला मोटार सायकलवर नेले जातें,पण मागे बसल्यावर चालकाच्या खांद्यावर राजा कन्नू ने टाकलेला हात सुद्धा त्या चालकांस नकोसा वाटतो.हे संकट कालीन न जाणारे " घृणास्पद" जात वास्तव चित्रीत केले  आहे. साप पकडून झाल्यानंतर संकटकालीन गरज संपल्यावर, सरपंचाच्या पत्नीचा गरिबांच्या,कनिष्ठ जातींच्या प्रति तोरा,अहंकार, हेकेखोरपणा,व "कृत्यघ्नता" निघून जातनाही.कृतज्ञता तर दूरच राहते पण   संकोटोत्तोर सुद्धा तीच तुच्छता कायम असते.हे मोठ्या खुबीने  दिग्दर्शकाने दर्शविले आहे.सरपंचाची पत्नी साप संकटानंतर कारमध्ये बसते व राजा कन्नू जेंव्हा त्याच्या गावाकडील असल्याची ओळख सांगतो तेंव्हा ती ओळख नाकारते व राजा कन्नूस म्हणते," कलतो तू मेरी बिरादरिका बोलेगा"म्हणून तुच्छता प्रकट करते.

आजही भिल्ल, पारधी,आदिवासी समाजातअसे अनेक राजा कन्नू आहेत.गांवकऱ्या द्वारे हत्त्या (बीड च्या मांगवडगांव ता.केज,पारनेर ता.पाटोदा,कुप्रसिद्ध ढोकी ता.कळंब  हत्त्याकांड)  पोलिसी अत्त्याचाराच्या व गुन्हा न केलेल्या पतीच्या सुटकेसाठी वकिलांचे उंबरे झिजवणाऱ्या पारधी ,भिल्ल,समूहाच्या" सेंगिनी "ग्रामीण भागातील पालांवर,वस्त्यांवर गावकऱ्यांच्या लैंगिक अत्त्याचाराच्या(शिकार) बळी ठरताहेत.  हिरो सुर्या शिवकुमारने ऍड.चंदरू,अभिनेत्री लिजोमोल जोस ने सेंगिनी, के.मनिकंदनने-राजा कन्नू, प्रकाश राज यानी आय.जी,जयप्रकाश यांनी DGP तर गुरू सोमा सुंदरमने पोलीस प्रॉसीक्युटर मोठ्या ताकतीने उत्तम रीतीने साकारले आहेत.

जयभीम या मुव्ही मध्यें "जयभीम" कुठेच नाही,एका संवादात फक्त "डॉ.आंबेडकर " यांच्या नावाचा ऍड.चंदरु उच्चार करतो आहे.पण पुतळा नाही, की कुठेही  घोषणाबाजी नाही.हाय कोर्टातील डॉ.आंबेडकरांची प्रतिमा मात्रं सहजपणे दाखवली आहे एव्हढेच.पण" मै किस्मत पर भरोसा नही करता,सच्चाईपे भरोसा करता हुं " हाअभिनेता  सूर्याचा तर "चोरी की कमाई नही,मेहनतकी कमाई खाते है हम" हे सेंगिनीने , उद्धट  पोलीस अधिकाऱ्याला दिलेल्या स्वाभीमानी उत्तरांचा संवाद नेहमीची आंबेडकरी प्रेरणा देतो.

डॉ.आंबेडकरांची जागतिक क्रांती सुद्धा हिंसारहित,सार्वजनिक संपत्तीची हानी न करता,रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली अभूतपूर्व "वैश्विक घटना" केवळ प्रचंड धारीष्ठ, अचाट बुद्धिमता,कायदा व संविधानाद्वारे केलेली " वैश्विक क्रांती" आहे.वंचितांना, (diprived people)पिढीतांना मिळवून दिलेला शाश्वत न्याय, आणि आंबेडकरी प्रेरणा हा "जयभीम "  चित्रपटांने दिलेला(World Level) विश्वस्तरीय संदेश आहे.म्हणून हा चित्रपट जगातील शोषितांचा हुंकार,अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करण्याचे हत्त्यार आहे.प्रचलित विषमतावादी व्यवस्थेला मारलेली थप्पड आहे.अश्या व्यापक अर्थाने त्या द्वारे मांडलेल्या  व्यथा,वेदना,व  वंचितांची कैफियत ही आंबेडकरी विचारांचा "सार "आहे. म्हणून हा "मुव्ही" प्रत्येकाने पहाणे अनिवार्य आहे.(Jay bheem movie)