जयहिंद डिफेन्स अकॅडमी मुरबाड यांचा आजादीचा अमृत महोत्सवी कार्यक्रम अंतर्गत स्वतंत्रता फ्रीडम दौड स्पर्धा संपन्न

मुरबाड तालुक्यातील तरुणांना डिफेन्स मध्ये सुवर्णसंधी मिळावी यासाठी कार्यरत असणारी जयहिंद डिफेन्स अकॅडमी च्या माध्यमातून आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने भारत सरकार  युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा संघ व जयहिंद डिफेन्स अकॅडमी आयोजित फिट इंडिया ,फ्रीडम रन  मुरबाड मधील  खरबावाडी येथे आयोजन केले .

जयहिंद डिफेन्स अकॅडमी मुरबाड यांचा आजादीचा अमृत महोत्सवी कार्यक्रम अंतर्गत स्वतंत्रता फ्रीडम दौड स्पर्धा संपन्न
Jayhind Defense Academy Murbad

जयहिंद डिफेन्स अकॅडमी मुरबाड यांचा आजादीचा अमृत महोत्सवी कार्यक्रम अंतर्गत स्वतंत्रता फ्रीडम दौड स्पर्धा संपन्न

मुरबाड तालुक्यातील तरुणांना डिफेन्स मध्ये सुवर्णसंधी मिळावी यासाठी कार्यरत असणारी जयहिंद डिफेन्स अकॅडमी च्या माध्यमातून आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने भारत सरकार  युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा संघ व जयहिंद डिफेन्स अकॅडमी आयोजित फिट इंडिया ,फ्रीडम रन  मुरबाड मधील  खरबावाडी येथे आयोजन केले.

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

मुरबाड तालुक्यातील तरुणांना डिफेन्स मध्ये सुवर्णसंधी मिळावी यासाठी कार्यरत असणारी जयहिंद डिफेन्स अकॅडमी च्या माध्यमातून आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने भारत सरकार  युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा संघ व जयहिंद डिफेन्स अकॅडमी आयोजित फिट इंडिया ,फ्रीडम रन  मुरबाड मधील  खरबावाडी येथे आयोजन केले होते या युवा स्वतंत्रता दौड मध्ये  52 युवक युवतींनी सहभाग घेतला होता.(Jayhind Defense Academy Murbad)

  या फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धेचे उद्घाटन जयहिंद डिफेन्स अकॅडमी चे प्रमुख मार्गदर्शक व पत्रकार जयदीप अढाईगे यांनी केले तर या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे अजित कारभारी राज्य युवा पुरस्कार महाराष्ट्र शासन सन्मानित हे होते तर प्रशिक्षक शैलेंद्र यादव , विष्णू गिरी , निकेश दळवी, स्वप्नील भोईर , किशोर गायकवाड (पत्रकार) सौ रंजना अढाईगे यांच्या प्रयत्नांने ही फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धा यशस्वी झाली.

या स्पर्धेत उमेश एगडे याने प्रथम , भास्कर वाघ द्वितीय तर दर्शन चौधरी याने तृतीय क्रमांक पटकावला तर सहभागी स्पर्धकांना भारत सरकार नेहरू युवा केंद्र ठाणे यांचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे अजित कारभारी यांनी मार्गदर्शन करताना अकॅडमी तील विध्यार्थ्यांना भारतीय सैन्य  दलाशह डिफेन्स साठी तयार होत असलेल्या तरुणांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले तर मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून भारतीय सैन्य दलात जास्तीत जास्त तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या जयहिंद डिफेन्स अकॅडमी च्या सर्व सदस्यांचे कौतुक करत तुमच कार्य यशस्वी होईल  या साठी शुभेच्छा दिल्या.(Jayhind Defense Academy Murbad)