पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं

झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीची आणि मुलीची निघृण हत्या केली आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं
Jharkhand Crime News

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, राक्षसी पतीने जे केलं ते हादरवणारं

झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीची आणि मुलीची निघृण हत्या केली आहे.

झारखंडच्या पाकुड जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका नराधमाने चारित्र्याच्या संशयावरुन आपल्या पत्नीची आणि मुलीची निघृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. आरोपी नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता केली जात आहे.संबंधित घटना ही पाकुड जिल्ह्यातील लिट्टीपाडा पोलीस ठाणे हद्दीतील गाडूपहाडी गावात घडली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या चिमुकलीला देखील सोडलं नाही. त्यांनी आईसोबत मुलीची देखील चाकून भोसकून हत्या केली.(Jharkhand Crime News)

या मायलेकीला मारणाऱ्या नराधमाचं नाव गंगाराम तुरी असं आहे. त्याने मित्र पवन कुमार साहा याच्यासोबत मिळून पत्नीची हत्या केली.मृतक महिलेचं नाव रानी तुरी असं होतं. गंगाराम तुरी याचं रानी हिच्याशीसोबत दुसरं लग्न झालं होतं. दोघांना एक लहान मुलगी होती. पण ती मुलगी आपली नसल्याचा दावा गंगाराम करायचा. त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे तो पत्नीला वारंवार शिवीगाळ करायचा. यावरुन दोघांमध्ये सारखा वाद सुरु असायचा.गंगारामने आपला मित्र पवन याच्यासोबत मिळून पत्नीची हत्या करण्याचा कट आखला.

 त्याने दवाखान्यात नेण्याचं कारण सांगून पत्नीला घराबाहेर नेलं. यादरम्यान वाटेत आरोपींनी पत्नी आणि लहान मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले. हत्येनंतर काही स्थानिकांना महिला आणि तिच्या मुलीचा मृतदेह मिळाला. पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास केला. त्यानंतर मृतक महिलेची ओळख पटली.(Jharkhand Crime News)

पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपींना बेड्या ठोकल्या. यावेळी पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.