कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-प्रा. एकता देशमुख

अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेले वक्तव्य निषेधार्ह असून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारे आहे.

कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-प्रा. एकता देशमुख
Jijau Brigade Thane

कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-प्रा. एकता देशमुख

अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेले वक्तव्य निषेधार्ह असून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारे आहे.

ठाणे, मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

 अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेले वक्तव्य निषेधार्ह असून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारे आहे.स्वातंत्र्यासाठी अनेकांनी रक्त सांडले,तुरुंगात हालअपेष्टा सोसल्या,लाठ्या-काठ्या खाल्या आणि त्यामुळे आपल्याला स्वतंत्र्य मिळाले.(Jijau Brigade Thane)

सिनेसृष्टीत कंगना वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे.परंतु तिने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी देशाचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणे हा देशद्रोह आहे म्हणून तिच्यावर शासनाने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि तिला मा.राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अन्यथा जिजाऊ ब्रिगेड राज्यात उग्र आंदोलन करेल.

अशी मागणी काल ठाणे जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्षा विद्या गडाख,जिल्हाध्यक्षा प्राध्यापिका एकता देशमुख,ठाणे शहराध्यक्षा प्रतिभा शिर्के,शहर उपाध्यक्षा रंजना शेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.(Jijau Brigade Thane)