जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत सफाळे परिसरात मोफत वह्यांचे वाटप 740 विद्यार्थ्यांना 2260 वह्या वाटप

पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत.

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत सफाळे परिसरात मोफत वह्यांचे वाटप  740 विद्यार्थ्यांना 2260 वह्या वाटप
Jijau Educational Social Organization

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत सफाळे परिसरात मोफत वह्यांचे वाटप 740 विद्यार्थ्यांना 2260 वह्या वाटप

पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. 

पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. परिसरातील 740 विद्यार्थ्यांना 2260 वह्या वाटप करण्यात आल्या आहे.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपसण्यासाठी व ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम पालघर ठाणे जिल्ह्यात राबवण्यात होत आहे.(Jijau Educational Social Organization)

पालघर व ठाणे जिल्ह्यातील  जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना 25 लाख वह्या वाटप करण्याचे उद्दिष्ट  आहे.अशा प्रकारे तालुक्यातील सफाळे, व एडवण विभागातील जलसार, भादवे,मथाने, उसरणी, एडवण, कोरे, डोंगरे, खार्डीपाडा, खार्डीगाव, दातिवरे, नवघर, कांदरवन या गावांमधील एकुण 740 विद्यार्थ्यांना 2260  वह्या  वाटप करण्यात आल्या. तसेच मनोर विभागातील कोकनेर, सागावे,गिरणोलु,वसले, लालठाणे, चहाडे, नावझे, साखरे, खामलोली , खरशेत वाकडी, वादिवली, काटाले, लोवरे,निहे अशा गावांना 1378 विद्यार्थ्यांना एकुण 4300 वह्यांचे वाटप करत त्यांच्या शिक्षणाची चालना देण्यात आली. या वह्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या  कार्यकर्त्यांच्या मदतीने वाटप करण्यात आल्या.यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य  संदेश ढोणे,  उसरणीचे सरपंच हरेंद्र (बंटी) पाटील, सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य दातिवरे रविंद्र भोईर, उपस्थित होते.(Jijau Educational Social Organization)

-रवींद्र घरत पालघर