महिलांच्या सक्षमीकरणासाठी निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेचे जिजाऊ लेकी चे प्रशिक्षण उत्साहात संपन्न

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्ष णिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोखाड्यातील स्मारकात दिनांक 19 ऑक्टोबर वार मंगळवार रोजी जिजाऊचा लेकी चे प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेचे जिजाऊ लेकी चे प्रशिक्षण उत्साहात संपन्न
Jijau Educational and Social Organization

महिलांच्या सक्षमीकरणासाठी निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेचे जिजाऊ लेकी चे प्रशिक्षण उत्साहात संपन्न

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्ष णिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोखाड्यातील स्मारकात दिनांक  19 ऑक्टोबर वार मंगळवार रोजी जिजाऊचा लेकी चे प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.

मोखाडा प्रतिनिधी माधुरी आहेर:

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्ष णिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोखाड्यातील स्मारकात दिनांक  19 ऑक्टोबर वार मंगळवार रोजी जिजाऊचा लेकी चे प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.चूल आणि मूल या परिघा मध्ये अडकलेल्या महिलेला स्वतःची ओळख, स्वतःच्या सुप्त शक्तीची जाणीव करून स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने जिजाऊच्या लेकी चे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.निलेश सांबरे यांच्या प्रेरणेतून जिजाऊ संस्थेच्या महिला सक्षमीकरण जिल्हाप्रमुख हेमांगी पाटील या ठाणे व पालघर जिल्ह्यातील महिलांसाठी या प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांना अर्थार्जनाच्या  मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तळागाळातील प्रत्येक महिलेला दिवसाचे किमान पन्नास रुपये तरी कमवता आले पाहिजे अशा प्रकारची शिक्षण या प्रशिक्षण शिबिरात दिले जाते आहे.(Jijau Educational and Social Organization)

18 व 19 ऑक्टोबर असे दोन दिवस हे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.या प्रशिक्षणाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.एरव्ही अबोल,घाबरट असणारी महिला निर्भीडपणे आत्मविश्वासपूर्वक आपले मत व्यक्त करत असून तिच्यात अमुलाग्र बदल झालेला दिसत आहे. या जिजाऊ लेखी चे प्रशिक्षण शिबिरातून इच्छुक असणाऱ्या गृहिणींना घर बसल्या काम मिळावे व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ओळखले सावण,अगरबत्ती,डिटर्जंट पावडर,भांडी घासण्याचे लिक्विड फिनेल,राखी बनवणे,वेणी बनवणे व पणत्या बनवणे यांसारखे मोफत स्वरूपात शिक्षण देऊन आर्थिक स्रोताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था करत आहे.याच उद्देशाने गेल्या वर्षभरात जिजाऊ संस्थेतर्फे शिलाई मशीन, घरघंटी वाटप करण्यात आली असून किराणा व्यवसाय,फळ व भाजीपाला व्यवसाय करणाऱ्यांना जिजाऊ च्या माध्यमातून रोख आर्थिक मदत करण्यात आलेली आहे.प्रशिक्षण देण्याचे काम संदिप ठाकरे करत आहे.(Jijau Educational and Social Organization)