निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेकडून मोखाडा तालुक्यात दोन हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप

माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व जिल्हा परिषद केंद्र शाळा मोखाडा येथे दोन हजार विद्यार्थ्यांना 5760 वह्यांचे वाटप केले आहे.

निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेकडून मोखाडा तालुक्यात दोन हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Jijau Educational and Social Organization

निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेकडून मोखाडा तालुक्यात दोन हजार विद्यार्थ्यांना वह्या वाटप

माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व जिल्हा परिषद केंद्र शाळा मोखाडा येथे दोन हजार विद्यार्थ्यांना 5760 वह्यांचे वाटप केले आहे.

माधुरी आहेर मोखाडा प्रतिनिधी:

माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मोखाड्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोखाडा,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा व जिल्हा परिषद केंद्र शाळा मोखाडा येथे दोन हजार विद्यार्थ्यांना 5760 वह्यांचे वाटप केले आहे.यावेळी रवींद्र खुताडे म्हणाले की,दुर्बल परिस्थितीमुळे गरीब,गरजू आदिवासी भागातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून हे काम अखंड व अविरतपणे सुरू आहे.जर शाळेकडून विद्यार्थी  उपलब्ध करून दिले.(Jijau Educational and Social Organization)

तर निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था १० वी च्या  विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी सुरू करेन असेही खुताडे म्हणाले.साधारण या तीन शाळांमध्ये 2044 विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या आहेत.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाची भावना पाहायला मिळाली व त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. जिजाऊ हि गोरगरिबांची आधारवड बनली आहे. आजारी,पिडित व्यक्तींना जिजाऊ संस्था माहिती मिळताच तातडीने मदत करत आहे.

युपीएससी व एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग चालवत आहे.तर अनेकांना मोठ्या आजारांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे.जिजाऊ ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे.आईच्या मायेने मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रविंद्र खूताडे,रोहीत चक्रवर्ती,रविंद्र साळवे,रमेश शिंदे,शिक्षक नितिन आहेर,सुमित जाधव, नरेन्द्र चौधरी,निखिल मुळे,आकाश वझरे आदि उपस्थित होते.(Jijau Educational and Social Organization)