निलेशजी सांबरे सस्थापित जिजाऊ ने जाळीचापाडा येथील आतड्याच्या आजाराच्या रूग्णाला केली आर्थिक मदत

निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेने मोखाडा तालुक्यातील जाळीचापाडा या गावातील सिता भगवान बोरसेंना आर्थिक मदत करून बोरसे कुटूंबाची मंदावलेली दिवाळी प्रज्वलीत केली.

निलेशजी  सांबरे सस्थापित जिजाऊ ने जाळीचापाडा येथील आतड्याच्या आजाराच्या रूग्णाला केली आर्थिक मदत
Jijau foundation News

माधुरी आहेर मोखाडा:

 निलेश सांबरे संस्थापित जिजाऊ संस्थेने मोखाडा तालुक्यातील जाळीचापाडा या गावातील सिता भगवान बोरसेंना आर्थिक मदत करून बोरसे कुटूंबाची मंदावलेली दिवाळी प्रज्वलीत केली असून आतड्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व अडचणीत असलेल्या सिता भगवान बोरसेला या रूग्णाला उपचारासाठी दि ५ नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी आर्थिक मदत केली.(Jijau foundation News)

आहे.जाळीचा पाडा येथील शाखाप्रमुख अशोक भोये यांनी संबधित रूग्णाला उपचारासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज असल्याची माहीती माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती व संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था निलेशजी सांबरे यांना दिली.गोरगरीब,आदिवासी,  वंचित,पिडीत यांचे कैवारी व जनसामान्यांचा आधारवड असलेले निलेश सांबरे यांनी याची दखल घेत तात्काळ जिजाऊच्या टिमला पाठवून हि मदत रूग्णाला पोहच केली आहे.त्यामूळे ऐन दिवाळीत निलेशजी सांबरे यांनी बोरसे यांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलीत केली असल्याचे मत पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे.

निलेशजी सांबरे हे अडचणीत असलेल्या गरिबाला,गरजूला रूग्णाला,पिडीताला माहीती मिळताच मदत करतात हा पक्का विश्वास जिजाऊ सदस्यांसह तालुक्यातील जनसामान्यांना निर्माण झाला आहे.उत्तम आरोग्य सुविधा,दर्जेदार शिक्षण,प्रत्येक गावाला चांगला रस्ता व महीलांचे सक्षमीकरण या व अशा अनेक उद्दिष्टांवर काम करणारी जिजाऊ संस्था दुर्गम आदिवासी भागाची आधारवड बनली असून तसा विश्वास जनमानसात निर्माण झाला आहे.(Jijau foundation News)