जोगेश्वरी श्यामनगर तलाव येथे गणपती विसर्जन उत्साहात संपन्न

जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव येथे काल अनंत चतुर्दशी च्या दिवशी ४७३ घरगुती गणपती आणि ८३ सार्वजनिक गणपती असे एकूण ५५६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

जोगेश्वरी श्यामनगर तलाव येथे गणपती विसर्जन उत्साहात संपन्न
Jogeshwari Shyamnagar Lake

जोगेश्वरी श्यामनगर तलाव येथे गणपती विसर्जन उत्साहात संपन्न

जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव येथे काल अनंत चतुर्दशी च्या दिवशी ४७३ घरगुती गणपती आणि ८३ सार्वजनिक गणपती असे एकूण ५५६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

मुंबई-गणेश हिरवे:

जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव येथे काल अनंत चतुर्दशी च्या दिवशी ४७३ घरगुती गणपती आणि ८३ सार्वजनिक गणपती असे एकूण ५५६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.महानगर पालिकेच्या माध्यमातून एकूण ५५ स्वयंसेवक भाविकांकडून  गणेश मुर्त्या घेऊन तलावामध्ये रीतसर विसर्जन करीत होते.(Jogeshwari Shyamnagar Lake)

आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत,  नगरसेवक श्री अनंत नर आदी सर्व पदाधिकारी  जातीने लक्ष घालून व्यवस्था पाहत होते. मुंबई महानगर पालिकेचे आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक तैनात होते.(Jogeshwari Shyamnagar Lake)