दिवाळ सणानिमित्त जॉय ची वृद्धांना मदत

जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळ सणानिमित्त सामजिक उपक्रम म्हणून यंदा संताक्रूज येथील कार्डिनल ग्रेसियस होम फॉर दि सीक अँड डाइंग डिस्ट्रीट्रेस या वृद्धश्रमातील एकूण ८० जणांना वस्तू वितरित करण्यात आल्या.

दिवाळ सणानिमित्त जॉय ची वृद्धांना मदत
Joy Social Organization Mumbai

दिवाळ सणानिमित्त जॉय ची वृद्धांना मदत

जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळ सणानिमित्त सामजिक उपक्रम म्हणून यंदा संताक्रूज येथील कार्डिनल ग्रेसियस होम फॉर दि सीक अँड डाइंग डिस्ट्रीट्रेस या वृद्धश्रमातील एकूण ८० जणांना वस्तू वितरित करण्यात आल्या.

गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व प्रतिनिधी:

जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळ सणानिमित्त सामजिक उपक्रम म्हणून यंदा संताक्रूज येथील कार्डिनल ग्रेसियस होम फॉर दि सीक अँड डाइंग डिस्ट्रीट्रेस या वृद्धश्रमातील एकूण ८० जणांना नवीन वस्त्रे म्हणून गाऊन,टॉवेल,तांदूळ,डाळ,कोलगेट,साबण,तेल,बिस्किट डायपर व लोकप्रिय हसती दुनिया मॅगझीन आशा वस्तू वितरित करण्यात आल्या.मुंबई-महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सामाजिक संस्था (रजि) म्हणूज जॉय ऑफ गिविंग ग्रुप ( इतरांना देण्यातला आनंद-मदत करणे ) परिचित आहे.(Joy Social Organization Mumbai)

लॉकडाउन काळातही जॉयच्या वतीने समाजातील गोर-गरीब,वंचित,रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची कुटुंब,घनकचरा कामगार,डोअर स्टेप स्कूल व आदिवासी विधार्थी,अनाथालयातील मुलं,वृद्धश्रम अशा अनेक जणांना किराणा किट,आरोग्य किट,शैक्षणिक साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले.आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील डहाणू, वाडा,जव्हार,मोखाडा,नवी मुंबई येथील आश्रम शाळा तसेच आरे कॉलनी व नॅशनल पार्क येथील आदिवासी पाडयातील हजारोंच्या संख्येने विधार्थीना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

कोणताही सामाजिक उपक्रम असेल तर जॉय संस्थेतील सभासद पुढाकार घेऊन स्वतः पदरमोड करतात, त्याचबरोबर समाजातील इतर अनेक दानशूर मान्यवर देखील या चांगल्या कामासाठी आपलं योगदान देत असल्याचं जॉयचे संस्थापक-अध्यक्ष गणेश हिरवे सांगतात.यापुढेही हे काम सुरुच राहणार आहे.दरवर्षी तीन-चार सामाजिक उपक्रम व इतरही अनेक समाजयोगी कार्यक्रमांचे आयोजन जॉय करीत असत.

जॉय च्या चांगल्या कामाची दखल वेळीवेळी अनेक वृत्तपत्र घेत असतात.आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने चंद्रशेखर सावंत,असूंता डिसोझा,  शिलाताई येरागी,छायाताई राणे,रोशनी ठोकळे, योगीता हिरवे,भूषण मुळे, रमेश माळवदे,श्रीराम कानडे,अल्बर्ट मोरे,अशोक चव्हाण,गोपाळ गावडा,मृण्मयी मुळे,अंजेलींना मोरे,प्रियांस हिरवे,आदी मान्यवर वेळातवेळ काढून उपस्थित होते.(Joy Social Organization Mumbai)