जॉय संस्था आयोजित दिवाळी निमित्त भेटकार्ड बनविणे स्पर्धा निकाल जाहीर

जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने दिवाळी २०२१ निमित्ताने घरीच स्वहस्ते ग्रीटिंग कार्ड बनविणे स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

जॉय संस्था आयोजित दिवाळी निमित्त भेटकार्ड बनविणे स्पर्धा निकाल जाहीर
Joy Social Organization Mumbai

जॉय संस्था आयोजित दिवाळी निमित्त भेटकार्ड बनविणे स्पर्धा निकाल जाहीर

जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने दिवाळी २०२१ निमित्ताने घरीच  स्वहस्ते ग्रीटिंग कार्ड बनविणे स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई गणेश हिरवे:

जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने दिवाळी २०२१ निमित्ताने घरीच  स्वहस्ते ग्रीटिंग कार्ड बनविणे स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी " देहदान-अवयवदान काळाची गरज ही थीम देण्यात आली होती व टाकाऊ वस्तूपासून भेटकार्ड तयार करून अवयवदान-देहदान याविषयी एखादा मेसेज,चारोळी,कविता आणि भेटकार्ड कसे तयार केले याची कृती लिहून पाठवायची होती.(Joy Social Organization Mumbai)

सदर स्पर्धा राज्यस्तरीय होती व याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत उज्वला सुतार-कल्याण प्रथम, बाळकृष्ण बाचल पुणे-द्वितीय, नम्रता मालकर रायगड-तृतीय, सोनाली शिंदे-महाड चतुर्थ, वेदांत पवार-मुंबई पंचम हे पाच विजेते ठरले तर उत्तेजनार्थ म्हणून भारती कुलकर्णी, सीमा मिरजकर, रंजना सावंत, भाग्यरेखा जोशी, राजश्री पांचाळ, मनीषा मोडक यांची निवड झाली. परिक्षक म्हणून रुता रानडे,भाग्यश्री रावले,फिलिप रोड्रिक्स शिवजी कुलाल,गणेश हिरवे आदि मान्यवरानी काम पाहिले. जानेवारीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा असून त्यात गुणानुक्रमे पाच विजेते व सहा उत्तेजनार्थ अशा एकूण ११ जणांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी दिली.(Joy Social Organization Mumbai)