न्यायिक मानवाधिकार परिषद च्या वर्धापन दिनानिमित्त अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप

बीड न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हाध्यक्षा स्वाती खुळे यांच्या वतीने अनाथ आश्रमात राहणाऱ्या, रस्त्यावरील गोर गरीब आणि झोपड पट्टीतील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप करण्यात आले.

न्यायिक मानवाधिकार परिषद च्या वर्धापन दिनानिमित्त अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप
Judicial Human Rights Council

न्यायिक मानवाधिकार परिषद च्या वर्धापन दिनानिमित्त अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप

बीड न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हाध्यक्षा स्वाती खुळे यांच्या वतीने अनाथ आश्रमात राहणाऱ्या, रस्त्यावरील गोर गरीब आणि झोपड पट्टीतील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप करण्यात आले.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हाध्यक्षा स्वाती खुळे यांच्या वतीने अनाथ आश्रमात राहणाऱ्या, रस्त्यावरील गोर गरीब आणि झोपड पट्टीतील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप करण्यात आले.बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारातील आदिवासी समीकरण अनाथ आश्रमातील मुलांना, वासनवाडी शेजारील झोपड पट्टीतील गोर गरीब मुलांना न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त खर्चिक कार्यक्रम रद्द करून समाज उपयोगी उपक्रम राबवून बीड जिल्हाध्यक्षा स्वाती खुळे यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्याचे आणि फळांचे वाटप करण्यात आले.(Judicial Human Rights Council)

याप्रसंगी बोलतांना स्वाती खुळे म्हणाल्या की, न्यायिक मानवाधिकार परिषद ही फक्त अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत नसून समाजातील गोर गरीब महिला, मुलं यांना मदतीचं काम देखील करत आहे. आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील, वाड्या वस्तीवरील गोर गरीब जनतेला न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो.आज वर्धापन दिन साजरा करताना खूप आनंद होतोय कारण एखाद्या ठिकाणी सत्कार, जेवणाचा कार्यक्रम न घेता हार,फेटे पुष्पगुच्छ वर होणार व्यर्थं खर्च टाळून गोर गरीब आणि गरजू लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य आणि फळे देऊन हा वर्धापन दिन साजरा केला.

यामुळे निस्वार्थ सेवा करण्याचा जो आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तो या माध्यमातून सार्थक झाल्याचे समाधान आहे.येणाऱ्या काळात देखील न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत राहून गोर गरीब लोकांना, महिलांना न्याय मिळवून देणार असल्याचे स्वाती खुळे यांनी सांगितले.याप्रसंगी बीड योगभूषण चे संपादक नितीन जोगदंड, पत्रकार सारिका गायकवाड यांचे देखील या कार्यास सहकार्य लाभले.बीड जिल्ह्यात प्रथमच न्यायिक मानवाधिकार परिषदेच्या माध्यमातून असा सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव आहे.(Judicial Human Rights Council)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/