केडीएमसीच्या आरोग्य निरीक्षकांनी केली कर्जतच्या डम्पिंग प्रकल्पाची पाहणी
आधारवाडी डँपिंगवर फुलबाग, भाजीपाला मळा, फळबाग बहरण्याचा मनपाचा मानस
केडीएमसीच्या आरोग्य निरीक्षकांनी केली कर्जतच्या डम्पिंग प्रकल्पाची पाहणी
आधारवाडी डँपिंगवर फुलबाग, भाजीपाला मळा, फळबाग बहरण्याचा मनपाचा मानस
कल्याण : कल्याण डोबिवली मनपाने शुन्य कचरा मोहिम सुरु करुन शहर स्वच्छतेचा वसा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी शनिवारी रविवारी कर्जत येथे त्यांनी राबिवलेल्या ४ एकर डँपिंग ग्राऊंड वरील फुलबाग, भाजीपाला मळा, फळबागेचा दोन दिवसीय पाहणी, प्रशिक्षण दौरा केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केला.
या दौऱ्यानिमित्ताने कल्याण आधारवाडी डँपिंगवर कर्जत येथील डँपिंग ग्राऊंडवर असणाऱ्या उघानाप्रमाणे उघान फुलविण्याचा प्रशासनाचा मानस असुन काही दिवसात आधारवाडी डँपिंगचे सपाटीकरण काम पुर्ण झाल्यानंतर फुल उघान, फळबाग, भाजीपाला मळा साकारण्याबाबत प्रस्ताव तयार केला असल्याचे घनकचरा व्यवस्थापनचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.
कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
______
Also see :अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड. वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी श्री. शरद पवार यांची भेट...
https://www.theganimikava.com/A-B-C-D-of-Scheduled-Caste-Reservation-Shri-Meeting-of-Sharad-Pawar