कल्पना गायकवाड यांचे मुरबाड तहसील समोर अमरण उपोषण 

उपोषणाला विविध पक्ष संघटनांच्या पाठिंबा......

कल्पना गायकवाड यांचे मुरबाड तहसील समोर अमरण उपोषण 
Kalpana Gaikwad's immortal fast in front of Murbad tehsil

कल्पना गायकवाड यांचे मुरबाड तहसील समोर अमरण उपोषण 
 

उपोषणाला विविध पक्ष संघटनांच्या पाठिंबा  

  
  
    मुरबाड तालुक्यातील मौजे देहरी येथे राहणाऱ्या पार्वतीबाई महादू गायकवाड यांच्या मालकीची जमीन सर्वे नंबर 40/ 6/3 क्षेत्र ०१ हेक्टर १७ झिरो या जमिनीची शासकीय मोजणी झाली असून काही वर्षांपूर्वी या जमिनीवर डोंबिवलीतील रजनी रामदास पाटील यांनी अतिक्रमण करून दलालांमार्फत खोटा दस्तऐवज करून विकत घेतली आहे. तरी ते अतिक्रमण न काढल्यामुळे पोलीस पत्नी ग. भा. पार्वतीबाई महादू गायकवाड, मुलगी कुमारी कल्पना गायकवाड, मुलगा संतोष गायकवाड यांनी न्याय मिळेपर्यंत मुरबाड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आज दिनांक 21/ 9/ 2020 पासून सुरू केले आहे. तरी या उपोषणाला तालुक्यातील विविध पक्ष संघटना तसेच नगरसेवक रवींद्र देसले, माजी आरोग्य सभापती मुरबाड नगरपंचायत आरपीआय आठवले पक्षाचे मुरबाड शहराध्यक्ष कैलास देसले, सिद्धार्थ युवक मित्र मंडळ यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

_____

Also see : शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामत अंत्य संस्कार 

https://www.theganimikava.com/Funeral-of-martyred-hero-Sachin-Jadhav