रामदास आठवले पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले येत्या रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त खेड आणि चिपळूणला भेट देणार आहेत.

रामदास आठवले पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर
Khed and Chiplun Flood

रामदास आठवले पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले येत्या रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त खेड आणि चिपळूणला भेट देणार आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले येत्या रविवारी (8 जुलै) रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त खेड आणि चिपळूणला भेट देणार आहेत.जुलैमध्ये अतिवृष्टीने खेड, चिपळूण आणि महाडमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात रामदास आठवले यांनी महाडला भेट देऊन पाहणी केली होती. तसेच दरडग्रस्त तळये गावाला भेट दिली होती.(Khed and Chiplun Flood)

आता संसदेच्या अधिवेशनातून वेळ काढून ते येत्या रविवारी खेड आणि चिपळूणमधील पुरग्रस्तांची भेट घेणार आहेत.आठवले खेडमधील पोसरे खुर्द बौद्ध वाडी या पूरग्रस्त गावाला रविवारी भेट देणार आहेत, अशी माहिती रिपाइंचे राज्य कमिटी सदस्य दादासाहेब मर्चंडे यांनी दिली आहे. खेडमधील पूरग्रस्त गावांना भेट दिल्यानंतर पूरग्रस्त चिपळूण शहरालादेखील भेट देणार आहेत.दरवर्षी पावसाळ्यात डोंगरावरील गावांमध्ये भूस्खलन आणि दरड कोसळून मनुष्यहानी होत आहे. राज्यात दरड कोसळून अनेक निष्पाप लोकांचे मृत्यू झाले आहेत.

तळीये गावात दरड कोसळून एकाचवेळी 40 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. घरांवर दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. नवीन गावे वसवावीत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली होती. गेल्या महिन्यात महाड येथील दरड कोसळलेल्या तळीये या गावातील दुर्घटनास्थळी रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.

त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आठवलेंनी ही मागणी केली होती.तळीये हे गाव अत्यंत उंचावर आहे. तेथे पुन्हा घरे बांधणे धोक्याचे होईल त्यामुळे म्हाडाने त्यांना अन्य सुरक्षित स्थळी घरे बांधून देण्याची सूचना रामदास आठवले यांनी केली. महाड शहरात ही पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक घरांचे तसेच व्यापारी, दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.(Khed and Chiplun Flood)

ज्या दुकानदारांकडे विमा नाही त्यांनाही शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.