मुप्टा च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहा, प्रा .शशिकांत जावळे (बीड जिल्हा समन्वयक )

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुप्टा शिक्षक संघटना बीड च्या वतीने "क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021" चे आयोजन करण्यात आले आहे.

मुप्टा च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहा, प्रा .शशिकांत जावळे (बीड जिल्हा समन्वयक )
Krantiba Jotiba Phule Teacher Award

मुप्टा च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहा, प्रा .शशिकांत जावळे (बीड जिल्हा समन्वयक )

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुप्टा शिक्षक संघटना बीड च्या वतीने  "क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021" चे आयोजन करण्यात आले आहे.

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुप्टा शिक्षक संघटना बीड च्या वतीने  "क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021" चे आयोजन करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास मा. तुषार ठोंबरे (अप्पर जिल्हाधिकारी), मा.विक्रम सारूक (शिक्षणाधिकारी मा. बीड) , प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर ( वृत्तपत्र विभाग स्वा.रा.ती. विद्यापीठ नांदेड), मुप्टाचे संस्थापक सचिव प्रा. सुनील (भाऊ) मगरे,मुप्टाचे विभागीय अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी वाघमारे , मा.नानासाहेब हजारे (उपशिक्षणाधिकारी जि.प. बीड) आदी मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे भूषविणार आहेत.(Krantiba Jotiba Phule Teacher Award)

सदर पुरस्कार वितरणाचे 13 वे वर्ष असून, हा पुरस्कार राज्यातील शिक्षकांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात असणारे अद्वितीय कार्य, उपक्रमात  सक्रिय सहभाग घेणाऱ्या शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते. सदर कार्यक्रम दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे सकाळी ठिक 10ः00 वा. आयोजित केला असून, या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन  मुप्टाचे बीड जिल्हा समन्वयक प्रा.शशिकांत जावळे यांनी केले आहे.(Krantiba Jotiba Phule Teacher Award)