श्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण संघावर कोरोनाची टांगती तलवार आहे.

श्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव
Krunal Pandya Corona positive

श्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण संघावर कोरोनाची टांगती तलवार आहे.

भारतीय संघातील  खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉजिटिव्ह आली. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या संपूर्ण भारतीय संघावर कोरोनाचे सावट आले असून याचे पडसाद इंग्लंड दौऱ्यावरी भारतीय संघावरही उमटू शकतात.(Corona joins Indian team in Sri Lanka)


कृणाल कोरोनाबाधित आढळल्याने मंगळवारी भारत आणि श्रीलंका India vs Sri Lanka यांच्यात होणारा दुसरा टी-20 सामना पुढे ढकलण्यात आला आहे. हा सामना सर्व खेळाडूंची टेस्ट निगेटिव्ह आल्यास बुधवारी खेळवला जाऊ शकतो. यासोबतच सर्व खेळाडूंची कोरोना टेस्टही करण्यात येत आहे. दरम्यान भारतीय संघातील 8 सदस्य हे कृणालच्या अधिक संपर्कात आल्याने त्यांना विलगीकरणात ठेवले आहे. यामध्ये पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही असून काही दिवसांतच हे दोघे इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघात सामिल होण्यासाठी रवाना होणार होते. 


इंग्लंडच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला दुखापतींच ग्रहण लागलं असून सद्यस्थितीला तीन भारतीय खेळाडू दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडले आहेत. यामध्ये काउंटी xi संघाकडून सराव सामना खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसह आवेश खानचा समावेश आहे. तर तिसरा खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिल आहे. WTC Final दरम्यान शुभमनला दुखापत झाली होती. त्यामुळे सामन्यानंतर शुभमनने दौऱ्यातून माघार घेत तो मायदेशी परतला आहे. 


विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.(Corona joins Indian team in Sri Lanka)

त्यामुळे शुभमन आणि सुंदरच्या जागी पृथ्वी आणि सूर्यकुमारला इंग्लंडला रवाना करण्यात येणार होते.