जाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम

यावर्षी आयपीएलच्या13 व्या हंगामासाठी स्पर्धेची सुरुवात युएईमध्ये आजपासून होत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयपीएलच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.....

जाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम
Learn the 6 changed rules of IPL this year

जाणून घ्या यावर्षी IPL चे बदललेले 6 नियम*

पिंपरी (pimpri) : यावर्षी आयपीएलच्या (|IPL) 13 व्या हंगामासाठी स्पर्धेची सुरुवात युएईमध्ये आजपासून होत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयपीएलच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

 'हे' आहेत बदललेले नियम:

थुंकी वापरण्यास बंदी : थुंकीचा वापर क्रिकेटमध्ये (cricket)  बॉल स्विंग करण्यासाठी केला जातो. मात्र कोरोनामुळे असे करण्यास बंदी घालण्यात आली असून यासाठी प्रत्येक संघाला दोनवेळा इशारा दिला जाईल. तिसऱ्या वेळी चूक केल्यास विरोधी संघाला पाच धावा अतिरिक्त मिळतील. तसेच टॉसनंतर कर्णधारांना एकमेकांसोबत हात मिळवता येणार नाहीत.

डबल हेेडर :

 आयपीएलमध्ये (ipl) यावर्षी डबल हेडर 10 दिवस ठेवण्यात आले असून 10 दिवस एकाच दिवशी 2 सामने होतील.

अनलिमिटेड कोरोना सब्स्टीट्यूट :

या नियमानुसार एखाद्या फलंदाज, गोलंदाजाला कोरोना (corona) झाल्यास त्याच्या बदली दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकते. 

जास्त दिवस सामने :

 गेल्या दोन हंगामापेक्षा 3 दिवस अधिक म्हणजेच 53 दिवस या हंगामात सामने चालणार आहेत.

सामन्यांची वेळ :

दर वर्षी 8 वाजता सुरू होणारा सामना या वर्षी 7:30 वाजता तर दुपारी 4 वाजता सुरू होणारा सामना 3:30 वाजता सुरू होणार आहे.

थर्ड अंपायर नो बॉल : आयपीएलमध्ये प्रथमच यावर्षी सामन्यात मुख्य अंपायल फ्रंट फुटचा नो बॉल देणार नाही तर त्यावर लक्ष ठेवण्याचे काम तिसऱ्या अंपायरचे असेल.

पिंपरी 
प्रतिनिधी - आत्माराम काळे

_____

Also see : भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Former India all-rounder Yuvraj Singh) केला खुलासा 

https://www.theganimikava.com/yuvraj-singh-say-ms-dhoni--shows-me-correct-picture-about-2019-world-cup-sports