लिंबू आणि संत्र्याचा आहारात समावेश करा

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

लिंबू आणि संत्र्याचा आहारात समावेश करा
benefits of lemon and orange

लिंबू आणि संत्र्याचा आहारात समावेश करा

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण निरोगी राहतो. दररोज जर आपण आहारात फळांचा समावेश केला तर अनेक रोगही आपल्यापासून दूर राहतात. मात्र, फळांचे फक्त एवढेच फायदे नसून.आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये लिंबू आणि संत्र्याचा समावेश केला तर आपली त्वचा आणि केसही सुंदर होण्यास मदत होते.(benefits of lemon and orange)

 लिंबू आणि संत्र्यामध्ये लोह भरपूर असते. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे केसांसाठी फायदेशीर आहे. कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे जे केसांसाठी फायदेशीर आहे. यामुळे पेशींची वाढ होते. या हंगामात केसांची काळजी घेण्यासाठी, आपण आपल्या आहारात संत्रा किंवा लिंबू समाविष्ट करू शकता.

पावसाळ्यात चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा फेसपॅक वापरू शकतो. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि चार चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला ही पेस्ट लावा.

साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि बेसन पीठाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ आणि सहा चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण दहा मिनिटांसाठी फ्रीमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.(benefits of lemon and orange)

यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.