बुधवारपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स

लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

बुधवारपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स
Local Railway Updates

बुधवारपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स

लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुबईची जीवनवाहिनी म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या प्रवाशांचे करोना लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना पास देण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.(Local Railway Updates)

सकाळपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी स्टॉल सुरु केले आहेत.महापालिका कार्यक्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, शहाड, आंबिवली, टिटवाळा या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकी शेजारीच महापालिकेकडून स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्टॉल्स सुरू राहणार आहेत. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.



ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल App च्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेवू नयेत.(Local Railway Updates)

लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.