कु. ऐश्वर्या चिकटे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पोलिटिकल सायन्स इंग्लंडला रवाना.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक कडून मार्गदर्शन व स्वागत

मुंबई लातूर सिद्धार्थ हौसिंग सोसायटी मध्ये राहणारी कु. ऐश्वर्या सुशील चिकटे ही देशातून पहिली बौद्ध कन्या उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाली.

कु. ऐश्वर्या चिकटे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पोलिटिकल सायन्स इंग्लंडला रवाना.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक कडून मार्गदर्शन व स्वागत
London School of Economics and Political Science

कु. ऐश्वर्या चिकटे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पोलिटिकल सायन्स इंग्लंडला रवाना.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक कडून मार्गदर्शन व स्वागत

मुंबई लातूर सिद्धार्थ हौसिंग सोसायटी मध्ये राहणारी कु. ऐश्वर्या सुशील चिकटे ही देशातून पहिली बौद्ध कन्या उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

मुंबई लातूर सिद्धार्थ हौसिंग सोसायटी मध्ये राहणारी कु. ऐश्वर्या सुशील चिकटे ही देशातून पहिली बौद्ध कन्या उच्च शिक्षणासाठी लंडन ला रवाना झाली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने तिचे स्वागत करून शुभेछ्या देण्यात आल्या.*आंबेडकरी विचाराच्या परिवारातील व देशातील पहिली बौद्ध कन्या ऐश्वर्या सुशील चिकटे ही लंडनला शिकायला जात असून याच युनिव्हर्सिटी मध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले होते.(London School of Economics and Political Science)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहुन आज सकाळी 2 वाजता कु. ऐश्वर्या विमानाने रवाना झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी ऐश्वर्याला पोषक मार्गदर्शन व पुढील गोष्टींची माहिती दिली शुभेच्छा व्यक्त केल्या.तत्पूर्वी देशातील प्रसिद्ध बौद्ध भिक्षु गड किल्ले संवर्धक व संविधान रक्षक पूज्य भदन्त शिलबोधी, कनिष्क कांबळे, विद्रोही पत्रकार रिपाई डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर, कॅप्टन श्रावण गायकवाड, विधिज्ञ प्रभाकर रनशूर व जेष्ठ बौद्ध उपासक सुरेश ढवळे यांसह अन्य उपस्तिथ होते.

पूज्य भन्ते शिलबोधी यांनी आरोग्य दीर्घायुष्य व शिक्षण संबंधी पुढील वाटचालीस मंगल कामना, आशीर्वाद व्यक्त केल्या तर सर्वांनी कु ऐश्वर्या चे मुख भरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.(London School of Economics and Political Science)