कोरोना उपचारांनंतर घरी येताच पाटील मालामाल

कोरोनाच्या संकटकाळात अनेक जण आर्थिकदृष्ट्या खिळखिळे झाले आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील दिवा भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे.

कोरोना उपचारांनंतर घरी येताच पाटील मालामाल
Lottery ticket

कोरोना उपचारांनंतर घरी येताच पाटील मालामाल

Patil's belongings as soon as he came home after Corona's treatment

कोरोनाच्या संकटकाळात अनेक जण आर्थिकदृष्ट्या खिळखिळे झाले आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील दिवा भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात अनेक जण आर्थिकदृष्ट्या खिळखिळे झाले आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील दिवा भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे. राजकांत पाटील या व्यापारी आणि लघु व्यावसायिकाने डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ड्रॉ जिंकत तब्बल 5 कोटी रुपयांची रक्कम मिळवली आहे. विशेष म्हणजे पाटील नुकतेच कोरोनावरील उपचार घेऊन घरी आले होते.

प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेण्याचीही प्रत्येकाची तयारी असते. तरीही ध्येय गाठायला वेळ लागतो. विशेषत: गेल्या वर्षभरापासून अनेकांच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सगळीकडे नकारत्मकता पसरली आहे. हातात आहे तेही गमावण्याची भीती आहे. त्यातच भविष्याची चिंता असल्यामुळे सर्वांच्याच मनात सतत धाकधूक सुरु आहे. अशा कठीण काळात डियर लॉटरीने पाटील यांच्या विश्वासाला पुन्हा उभारी देत आयुष्यात सकारात्मकता निर्माण केली.

कोरोना महामारीला सुरुवात झाल्याबरोबर संपूर्ण जग ऑनलाईन शॉपिंगकडे वळले आहे. जीवनावश्यक वस्तूही ग्राहकांना घरपोच मिळू लागल्या. डियर लॉटरीने घोषणा केली की ते आपल्या ग्राहकांना घरपोच लॉटरी तिकिट्स पोहोचवण्याची सेवा देऊन ही नवीन जीवनशैली अंगीकारतील. यामुळे ग्राहकांची संख्या वाढली आणि जबरदस्त कॅश प्राईजेस घरबसल्या, कोणत्याही त्रासाविना सहज जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली.

राजकांत पाटील ठाण्याजवळच्या दिवा भागात आपली पत्नी, आई आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांना जेव्हा लॉटरीविषयी समजलं, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “मला स्वत:ला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. यातून पूर्णपणे बरा झाल्यावर, जेव्हा मी घरी परतलो तेव्हा मला डियर लॉटरीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याविषयी एक मेसेज आला.

नमस्कार पाटील साहेब. तुम्ही डियर लॉटरी टीमच्या इतर 25 सदस्यांसह कॉन्फरन्स कॉलवर आहात आणि आम्ही तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही 5 कोटी रुपये जिंकलेले आहात’ असं त्यांनी फोनवर सांगताच काही क्षण मी गांगरलो आणि हे खरंच घडलं आहे याची जाणीव झाल्यावर आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते” अशी प्रतिक्रिया डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 चे मानकरी ठरलेल्या राजकांत पाटील यांनी दिली.

या लॉटरी तिकिटांची किंमत अवघ्या सहा रुपयांपासून सुरु होते. समाजातील प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी व्हावा हाच या मागचा हेतू असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्याच्या कठीण काळामध्ये, या महामारीला तोंड देताना, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पगार कमी झाले आहेत. अशा स्थितीत नवीन आशा बाळगणे आणि स्वत:ला धीर देणे कठीण होऊन बसले आहे.

म्हणूनच डियर लॉटरी आपल्या मजेशीर स्पर्धांच्या माध्यमातून लोकांना नशिबावर विश्वास ठेवण्यास आणि आपलेही भविष्य कधीतरी बदलेल अशी आशा बाळगण्यास प्रोत्साहित करत आहे.