पैसे पूरग्रस्त-कोरोना पीडितांना द्या

ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक हात मदतीचा' उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध विभागातून आज पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक सामग्री वाहनांमधून रवाना करण्यात आली.

पैसे पूरग्रस्त-कोरोना पीडितांना द्या
MLA Sandeep Naik birthday

पैसे पूरग्रस्त-कोरोना पीडितांना द्या 

ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक हात मदतीचा' उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध विभागातून आज पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक सामग्री वाहनांमधून रवाना करण्यात आली.

ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील विविध विभागातून आज पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक सामग्री वाहनांमधून रवाना करण्यात आली. नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि गणेश नाईक चारीटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली आहे.लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मदतीची वाहन कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांमध्ये रवाना झाली.*(MLA Sandeep Naik birthday)

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्यातील पूरग्रस्त परिस्थिती पाहता समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत संदीप नाईक यांनी यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणीही बॅनर आणि होर्डिंग लावू नये आणि वाढदिवस साजरा करु नये त्याऐवजी कोरोना पीडितांना आणि पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन केले होते. त्यानुसार नवी मुंबईतून मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. खास करुन संदीप नाईक यांना माणणारा युवा वर्ग मोठ्या संख्येने पुढे आला.दिघा, ऐरोली, दिवा गाव, रबाळे, खैरणे बोनकोडे, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सीवूड, करावे, सानपाडा, तुर्भे या भागातील कार्यकर्ते ही मदत घेऊन स्वतः पूरग्रस्त भागांमध्ये ती पोहोचवणार आहेत.

लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी सभापती आनंत सुतार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लोकनेते आमदार गणेश नाईक म्हणाले, “संकटग्रस्तांना मदत करण्याची नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची भावना नेहमीच दिसून येते.(MLA Sandeep Naik birthday)

विशेषतः संदीप नाईक यांच्या आवाहनानुसार नवी मुंबईतील युथ ब्रिगेडचा कर्तव्यभावनेने पूरग्रस्त मदत कार्यातील सहभाग कौतुकास्पद आहे.